महाराष्ट्रातील कोल्हापूर भागात बोलली जाणारी ही मराठीची एक बोली आहे. या बोलीत लय काढून बोलण्याची लकब आहे. तसेच कोकणी भाषेचा प्रभाव या बोलीवर दिसतो. भाषेत रांगडेपणा व शिव्यांचा वापर आढळतो. [ संदर्भ हवा ]

Look up कोल्हापुरी बोली in
Wiktionary, the free marathi dictionary.
कोल्हापुरी बोली ह्या बोलीभाषेची शब्दसूची
विक्शनरी, या मुक्त शब्दकोशात पाहा/तपासा/अद्याप नसलेले शब्द/वाक्यांश जोडा अथवा सूची:मराठी बोलीभाषातील शब्द येथे मराठी बोलीभाषांची सामायिक शब्दसूची पहा

वैशिष्ट्ये संपादन

रविशंकर यांच्या मतानुसार ' कोल्हापुरी बोलीत सर्वच पुल्लिंगी गोष्टींना नपुसकलिंगी संबोधले जाते; रीति भूतकाळ हा साध्या भविष्यकाळांत परिवर्तित होतो आणि संवादातल्या समेच्या सर्व क्रिया आवाजांसकट सजीव होतात. '[१][ दुजोरा हवा]

या कोल्हापुरी बोलीची अनेक वैशिष्ट्ये आहेत... त्यांपैकी काही येणेप्रमाणे-----
१) शिवराळपणा - शिव्या वादावादीत तसेच मैत्रीपूर्ण संवादातही वापरल्या जातात.
उदा: सुक्काळीच्या [हा शब्द कन्नड भाषेतून आलेला आहे], राण्डंच्या [ अस्सल कोल्हापुरी बोली ], शिंदळीच्च्या [कोंकणी मराठी मधून], बसवीच्च्या ['बाजारबसवीच्च्या'चे संक्षिप्त रूप], इ.
हे सर्व शब्द संस्कृतात ' भो दास्याःपुत्र ' अशी जी शिवी वापरीत असत, त्याचे अपभ्रंश आहेत.
आजही कोल्हापुरांत रस्त्यावरून चालतांना कुणी लंगोटीयार भेंटला, की ' काय राण्डंच्या...हिकड कुनीकडं निगालंय्‌स? ' असे सर्रास प्रेमळपणे हटकणारे लोक जागोजागी दिसतात.
ग्राम्य शब्द [शिव्यां]च्या बाबतीत असेही दिसते की सुशिक्षित वर्गांत वापरल्या जाणाऱ्या सभ्य सोवळ्या बोली मराठीतही अनेक ग्राम्य शब्द आहेत, जे तोंडी रुळल्यामुळे, ते ग्राम्य आहेत हे बोलणाऱ्यांच्या गावीही नसते...उदा. 'गलथान' आणि 'अजागळ' हे रोजच्या व्यवहारात सर्रास वापरले जाणारे शब्द. मुळात 'स्तन' या संस्कृत शब्दाचा 'थान' हा ग्राम्य आविष्कार आहे...यास्तव हे दोन्ही शब्द म्हणजे एक प्रकारे शिव्याच आहेत...फक्त सर्रास वापरामुळे ते बोलणाऱ्याला जाणवत नाही इतकेच. संस्कृतात 'अजा' याचा अर्थ बकरी. बकरीची स्तनं जशी इतस्ततः लळत लोंबत असतात, तद्वत् लळत लोंबत जन्म घालवणाऱ्याला 'अजागलस्तन' / 'अजागलस्तनी' अशी विशेषणे संस्कृतात वापरली जातात.चाणक्यनीति या आर्य चाणक्यानं रचलेल्या ग्रंथात ह्या शब्दांचा वापर केलेला आढळतो.ते सुभाषित असं आहे..
. ॥ धर्मार्थकाममोक्षाणां यत्रैकोsपि न विद्यते
अजागलस्तनस्यैव नरजन्मो निरर्थकः ॥
--- चाणक्यनीति.
अर्थ: ज्या मनुष्याच्या जीवनात धर्म, अर्थ, काम, आणि मोक्ष या चार पुरुषार्थापैकी एकही शिल्लक उतरलेला नसतो, त्याचा/तिचा जन्म बकरीच्या इतस्ततः लोंबणाऱ्या स्तनांसारखा निरर्थक होतो.
२) रीति भूतकाळ हा सामान्य भविष्यकाळात बोलला जातो. उदा: ' आनन्दा रोज बाजारांत जायचा ' [ह्ये आंद्या रोजच्याला बाजारांत जानार बगा]
३) अनेक क्रियापदांत इ कार वापरला जातो - उदा: वांचवलं [वाचिवलं], बसवलं [बशिवलं], घालवतो [घालिवतंय्] इ.
४) अनेक नाम-सर्वनामांत उ-कार वापरला जातो - उदा: कागद [कागूद ], दगड [ दगूड ], बोकड [बोकूड] इ.
५) कानडी छापाचे हेल काढले जातात. उदा: ' ह्ये आ s s s s s s स्सं चंवताळलं बगा त्ये.
६) अनेक शब्द लोकजीवनातून आलेले आणि रूढ झालेले आहेत.- उदा: डॅंबीस अथवा टग्या [ब्येनं], ठेंगा [हिंगणमिट्टा], खमक्या [खमक्या], उचापती [इदरकल्याणी], कंचाटा [खंचका],अडेलतट्टू [आडदांड], वेगांत [बुंगाट],डोके [डोस्कं,टाळकं,टकुरं] इ.
७) समेच्या क्रिया आवाजासकट सजीव होतात. उदा: झाम्म् दिशी कानपाडात हानली, बकाका लाथा घातल्या, फास्स्दिशी वडलं, कचांचां मटन हादाडलं. इ.
८) एकापाठोपाठ एक होणाऱ्या क्रियासंठी'श्यान्' प्रत्ययाचा वापर - उदाहरणार्थ १) जेवून झोपलो [ज्येऊनश्यान् झोपलो] २) बाजारात जाऊन येतो [बाजारला जाऊनश्यान् येतंय्]
९) 'ओ' कारा एवजी 'व' काराचा वापर - उदा: ओढले [वडलं], ओरपले [वरापलं], ओरडला [वराडलं] इत्यादी
१०) पूर्ण भूतकाळासाठी 'लेलो'/'ल्याली' प्रत्ययांचा वापर - उदा: गेलो होतो [गेलेलो], खाल्लं होतं [खाल्ल्यालं] , झोपली होती [झोपल्ल्याली]
११) अपभ्रंशांचा वापर - उदा. : भाऊजाया [भावजय], पादत्राण [पायत्तान्],पाणी[पानी],लोणी[लोनी],इकडं[हकडं], तिथं[ततं],इ.
१२) 'अ' ऐवजी 'आ'चा वापर -उदा: गाढव [गाडाव], माकड [माकाड],वातड/चांबट [वाताड/चांबाट]
१३) मात्रे ऐवजी 'ये' काराचा वापर - उदा: हेलपाटला [ह्येलपाटलं] , पेंचले [प्येचाटलं] , चेचले [च्येचाटलं] , मेणचट [म्येनचाट्]
१४) मातीतून जन्मलेले शब्द - उदा: नणंद [वन्सं], पहार [ऐदान्], लक्तर [दारकाण्ड],गुरुवार [भेस्तरवार], रविवार [ऐतवार],रखेली [शिंदळी- शुद्ध पुणेरी बोलीत वापरल्या जाणाऱ्या 'शिनळीच्च्या' ह्या शिवीचा उगम या मूळ कोल्हापुरी बोली शब्दात आहे],खुबा[फरा],आस्सं[हंगाश्शी],इ.
१५)आदरार्थी वाक्यांच्या क्रियापदांत 'सा' / 'ती'चा वापर - उदा: बापू बाहेर गेलेत [बापू भायेर गेल्याती], काय म्हणताय्?[ काय म्हन्तायसा?] इ.
१६) पूर्ण वर्तमानकाळी क्रियापदांसाठी 'या' प्रत्ययाचा वापर - उदा: दाजीनीं तुम्हांला बोलावलं आहे. [ दाजीनीं तुमास्नी बंलिवलंया], मी हे पुस्तक वाचलं आहे. [म्या ह्ये बाड वाचलंया ], इ.
१७)भविष्यकालीन क्रियांसाठी 'याल' प्रत्ययाचा वापर - उदा: सगळी माणसं येतील ना? [समदी मानसं येत्याल न्हवं?], माझी मुलं नंबरांत झळकतील बघा. [माजी प्वारं नंबरांमंदी झंळकत्याल बगा]
१८)सप्तमी विभक्तिसाठी 'मंदी' प्रत्ययाचा वापर - उदा: घरांत [घरामंदी], शाळेत [साळंमंदी], बोचक्यात[बुचक्यामंदी], इ.
१९)
GABBOO190883 (चर्चा) १२:००, ९ एप्रिल २०१६ (IST)

उदाहरणे संपादन

* कथेतील उदाहरणे

सकाळचं आट वाजलं तसं कौशीनं च्याचं आदान ग्यासवर चढीवलं . मारत्या रातपाळी करून याची वेळ झाल्याली. आदनात च्या-साकर घालताना, मारत्या आल्यावर मनातला ब्येत तेच्या डोस्कीत कसा उतरवायचा हेचा ती इचार कराय लागली. आंगुळीचं पानी न्हाणीत ठेवायला ती आत गेली तवर मारत्या कवा डूटीवरनं यून हातरुनात गडप झाला त्ये तिला समजलंच न्हाई. सज नजर भिताडाकडं ग्येली तर मोळ्याला प्यांट आडिकल्याली. बघतीया तर मारत्या खालवर कांबळं घ्यून घोराय लागलाता.

मौ कवळा आवाज काडून कौशीनं हाळी दिली,

'आवं..'

'घुर्रर्र..!'

'आईकतासा न्हवं... '

'घुर्रर्र..ठिस्स !'

'आत्ता ! माज्या जीवाला हितं घोर लागलाय आन तुमी घोरायलायसा ? उटा उटा !' कौशी चं डोस्कं फिरलं...अधिक वाचनसाठी बाह्यदुवा

  • कॉपीराईट अनुमती संदर्भ : २ मार्च, २०१६ रोजी अल्प लेखांश उदाहरण म्हणून वापरण्या साठी प्रताधिकार मुक्तीच्या व्यनिचे छायाचित्र लवकरच जोडले जाईल.
  • उदाहरण क्रमांक २:
    • कोल्हापुरी कलगीतुरा शीर्षकः॥ ’किश्या’च्या ’नाना’ची ’फूंक’ ॥. [१] - लेखक : [रविशंकर]


साहित्यातील उदाहरणे संपादन

कथाकार श्री. शंकर पाटील, व्यंकटेश माडगूळकर, दया पवार, या लेखकांच्या कथांमध्ये कोल्हापुरी बोलीचा वापर दिसून येतो.

वगनाट्यांमधील उदाहरणे संपादन

चित्रपटांमधील उदाहरणे संपादन

पिंजरा, केला इशारा जाता जाता, पाटलाची सून, सांगत्ये ऐका, पांडू हवालदार, सोंगाड्या अशा सारख्या ग्रामीण पार्श्वभूमीच्या चित्रपटांमध्ये कोल्हापुरी बोलीतील संवाद आले आहेत.

दूरचित्रवाणी मालिकांमधली उदाहरणे संपादन

संदर्भ संपादन

{{कपाळाला हात - मराठी कथासंग्रह - लेखक: रविशंकर नानिवडेकर. [२]}}

संदर्भ संपादन

  • 'वल्ली तिलवल्ली'- लेखक: रविशंकर नानिवडेकर.[कन्नड छापाची मराठी बोली] [३]
  • ' किश्याच्या नानाची फूंक ' - लेखक: रविशंकर नानिवडेकर.[कोल्हापुरी बोलीतला कलगीतुरा] [४]
  • 'वडाप' - लेखक: रविशंकर नानिवडेकर.[कोल्हापुरी बोली चं विवेचन/अस्सल कोल्हापुरी बोली] [५]
  • 'खिळसाण्ड' - लेखक: रविशंकर नानिवडेकर. [कोंकणी मराठीचा नमुना]

[६]

बाह्य दुवे संपादन

१>[७] २>[८]

  1. ^ लेखक:रविशंकर नानिवडेकर. [वडाप ले. रविशंकर नानिवडेकर "लेख शीर्षक: ॥ वडाप ॥"] Check |दुवा= value (सहाय्य) (मराठी (आणि कोल्हापुरी बोली) भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)