कोरोझाल टाउन बेलीझच्या कोरोझाल जिल्ह्यातील शहर व प्रशासकीय केन्द्र आहे. २०१० च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ९,८७१ इतकी होती. येथील बहुसंख्य वस्ती एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात झालेल्या युकातान संघर्षातील निर्वासितांचे वंशज आहेत. १९५५ साली आलेल्या हरिकेन जॅनेटने या शहराचे अतोनात नुकसान केले होते. कोरोझाल टाउनची त्यानंतर मोठ्या प्रमाणात पुनर्बांधणी करण्यात आली आहे.

हे शहर प्राचीन माया संस्कृतीतील शहरावर बांधले गेले आहे. पूर्वी चेतुमाल नावाने ओळखले जाणारे शहर हेच असावे असा अंदाज आहे. आता चेतुमाल नावाचे वेगळेच शहर मेक्सिकोमध्ये आहे.