कोराकु-एन

ओकायामा मधील बाग

कोराकु-एन (जपानी:後楽園) ही जपानच्या ओकायामा शहरातील एक बाग आहे. ही बाग जपानच्या तीन महान पारंपरिक बागांपैकी एक मानली जाते. हिची रचना इ.स. १६८७ ते इ.स. १७००च्या दरम्यान ओकायामाचे अधिपती इकेदा त्सुनामासाने केली. इ.स. १८६३च्या सुमारास या बागेला आत्ताचे रूप आले. सुरुवातीस यास कोएन असे नाव होते. ही बाग आशी नदीच्या काठी असून हिचा विस्तार १,३३,००० चौरस मीटर, तर हिच्यातील हिरवळीचा भाग अंदाजे १८,५०० चौरस मीटर इतका आहे. बागेच्या मध्यात असलेल्या तळ्यात क्योटोजवळील बिवा सरोवरातील दृश्ये निर्माण करण्यात आली आहेत.

कोराकु-एन

इ.स. १८८४मध्ये ही बाग तत्कालीन मालकांनी ओकायामा प्रभागाच्या हवाली केली व सामान्य जनांना तेथे प्रवेश दिला. इ.स. १९३४मध्ये आलेल्या महापुरात तसेच दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बफेकीमध्ये या बागेचे मोठे नुकसान झाले होते. जुन्या नकाशा व चित्रांवरून हिची पुनर्उभारणी करण्यात आली.

भारताच्या पुणे शहरातील पु.ल. देशपांडे उद्यानाची रचना या बागेवर आधारित आहे.