भेटकलमाने अथवा व्हेनीर पद्धतीने आंब्याची कलमे करतात. ह्या पद्धती थोड्या अवघड व कठीण आहेत. म्हणून आंब्याची कोय कलम करण्याची नवीन पद्धत शोधून काढण्यात आली आहे. ही पद्धत किफायतशीर आहे कारण ती साधी व सोपी असल्याने शेतकरी स्वतः कलमे तयार करू शकतात. एका वर्षात ही कलमे लागवडीस योग्य होतात. कलमाचा जोड चांगला होत असल्याने ती जोमाने वाढतात. ही कलमे जुने ते ऑगस्टपर्यंत करीत असल्याने मातृवृक्षाच्या काड्यांची कमतरता नसते. साधारण ७० % कलमे यशस्वी होतात.