कोडागु हा भारताच्या कर्नाटक राज्यातील जिल्हा आहे. याचे मुख्य शहर मडिकेरी येथे आहे.

हा जिल्हा मैसूर प्रशासकीय विभागात मोडतो. २००१ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या ५,४८,५६१ होती. त्यानुसार हा जिल्हा कर्नाटकातील सगळ्यात कमी वस्ती असलेला जिल्हा आहे.