अकोले शहराच्या उत्तरेला कोंभाळणे गाव वसलेले आहे. या गावाची लोकसंख्या सुमारे २५०० च्या आसपास आहे. याठिकाणी कोंभाळणे या प्रमुख गावासह आजूबाजूला ठाकरवाडी, बांबळेवाडी, पोपेरेवाडी आणि मानमोडी या प्रमुख वस्त्या आहेत. येथील लोकसंख्या ही ST (आदिवासी) SC(दलित) तसेच OBC (कानडी) आहे. या सर्व लोकांमध्ये एक कमालीचं साधर्म्य आहे.त्यामुळे येथे कोणतेही भांडण तंटे आणि जातीवाचक बाब अस्तित्वात नाही. या गावाला पेसा क्षेत्राचा दर्जा प्राप्त झालेला आहे. या गावच्या बहुतांश शेतजमिनीत पवनचक्की व सौरऊर्जा प्रकल्प उभे राहिले आहेत. यादरम्यान संबंधित प्रकल्पासाठी शेतकऱ्यांकडून जमिनींचे हस्तांतरण करत असताना मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याची बाब सर्वसामान्यांमध्ये चर्चेचा विषय बनला आहे.

या गावातील सर्वच 97% नागरिक हे शेती करत आहेत. परंतु, येथील नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागते. येथे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नसल्याने येथील शेतकरी आजही खिन्न अवस्थेत आहे. त्यामुळेच येथील शेतकरी बांधव निव्वळ भातशेतीवर आपले जीवन जगत आहे.

प्रसिद्ध व्यक्ती संपादन

राहीबाई पोपेरे[१]

  1. ^ महाराष्ट्र टाईम्स, रविवार दिनांक १० मार्च २०२४.