केनी
केनी ही पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव कॉमेलिना डीफ्युजा असे आहे.
केनीच्या कॉमेलिना डीफ्युजा आणि कॉमेलिना डीफ्युजा व्हर. गिगाज या दोन प्रजाती आहेत. यातील दुसरी प्रजाती आशिया खंडातील स्थानिक प्रजाती आहे. या वनस्पतीला निळ्या रंगाची फुले येतात.
वर्णन
संपादनकेनी सामान्यपणे वार्षिक वनस्पती आहे. मात्र विषुववृत्तीय प्रदेशात ती बहुवार्षिक असू शकते.[१] केनीला जुलै ते सप्टेंबर या काळात फुले आणि फळे लागतात.
आढळ
संपादनकेनी भारतात ओलसर, दलदलीच्या जागी तणाच्या स्वरूपात उगवते. कधीकधी शेतांमध्ये तण म्हणून उगवलेलीसुद्धा दिसते.[२]
भारतात ही वनस्पती महराष्ट्र, आसाम, केरळ, ओरिसा, तामिळनाडू इ. राज्यात आढळते.[२]
महाराष्ट्रातील वापर
संपादनमहाराष्ट्रात श्रावण महिन्यात उपास सोडताना केनीची भजी केली जातात.[३] केनीची भाजीसुद्धा केली जाते. केनी-कुर्डूच्या भाजीचा उल्लेख चातुर्मासाच्या कहाणीमध्ये आहे.
इतर देशांमध्ये केला जाणारा वापर
संपादनचीनमध्ये या वनस्पतीचा औषधी वनस्पती म्हणून वापर केला जातो. फुलांपासून निळा रंगसुद्धा तयार केला जातो.
संदर्भ आणि नोंदी
संपादन- ^ "Commelina diffusa in Flora of North America @ efloras.org". www.efloras.org. 2020-10-22 रोजी पाहिले.
- ^ a b "Commelina diffusa Burm.f." India Biodiversity Portal. 2020-10-22 रोजी पाहिले.
- ^ "श्रावण मासी...केनीची भजी!". Maharashtra Times. 2020-10-19 रोजी पाहिले.