केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ
केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ हे भारत देशातील विशिष्ट शैक्षणिक विकासासाठी माहिती मागविणे, माहितीचे परिक्षण करणे आणि त्या विषयी सरकारला आणि संस्थांना सल्ला देण्याच्या उद्देशाने स्थापन केलेले मंडळ आहे. याची स्थापना कोलकाता विद्यापीठ आयोगाच्या शिफारसीवरून १९१९ साली झाली. केंद्रीय शिक्षण मंत्री याचे अध्यक्ष असतात.