कृष्णात खोत
कृष्णात खोत हे मराठी लेखक आहे. २०२३ मध्ये त्यांच्या रिंगाण कादंबरीसाठी त्यांना मराठीतील साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. कादंबरीचा विषय हा धरग्रस्त विस्थापित लोकांच्या जीवनावर आधारीत होता व त्यांच्या अडचणी आणि संघर्षांना दर्शवीतो.[१]
खोत यांचा जन्म निकमवाडी, पन्हाळा (कोल्हापूर) येथे झाला. त्यांनी कोल्हापूरच्या शहाजी कॉलेजलमधून बी.ए. केले. नायकवडी येथे ते वसतिगृहाचे रेक्टर म्हणून काम केले व सोबतच त्यांनी इतिहास, राज्यशात्र आणि मराठीतून एम.ए. केले. पुढे ते ज्युनिअर कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले.[२]
लेखन
संपादन- २००५ - गावठाण, मौज प्रकाशन
- २००८ - रौंदाळा आयएसबीएन 8171859623, पॉप्युलर प्रकाशन
- २०१२ - झडझिंबड, पॉप्युलर प्रकाशन
- धुळमाती, मौज प्रकाशन
- नागरल्याविन भुई, मौज प्रकाशन
- २०२२ - रिंगाण,
- २०२४ - काळ्यामाळ्या - भिंगोळ्या आयएसबीएन 8195668887, पॉप्युलर प्रकाशन
संदर्भ
संपादन- ^ "कृष्णात खोत यांच्या "रिंगाण" कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार". 3 डिसेंबर 2024 रोजी पाहिले.
- ^ माळी, गुरुबाळ. "विस्थापितांचा आवाज मांडणाऱ्या 'रिंगाण'ला साहित्य अकादमी पुरस्कार, कृष्णात खोत यांच्या लेखनाचा गौरव". 5 डिसेंबर 2024 रोजी पाहिले.