कृष्णशीर्ष हरिद्र (इंग्लिश:South Indian Blackheaded Oriole) हा पक्षी आकाराने मैनेएवढा असतो.

कृष्णशीर्ष हरिद्र

हा पक्षी चकचकीत सोनेरी पिवळ्या रंगाचा असतो. कंठ, डोके आणि छातीवर काळा रंग असतो. तसेच गुलाबी चोच व डोळे लाल असतात. नर-मादी दिसायला सारखेच असतात. मात्र मादीच्या डोक्यावर मंद काळा वर्ण असतो.

वितरण संपादन

हे पक्षी सर्व भारतभर पसरलेले आहेत. हिमालयात ४,००० फुटांपर्यंत, बांगलादेश, श्रीलंका, ब्रह्मदेश या ठिकाणी आढळतात.

निवासस्थाने संपादन

साल, निम-सदाहरितपर्णी आणि सदाहरितपर्णी तसेच पानगळीची वने या ठिकाणी राहतात.

संदर्भ संपादन

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली