कुसुम अभ्यंकर या एक मराठी लेखिका होत्या. त्यांनी कथा, कविता, नाटक, प्रवासवर्णन आणि कादंबरी या प्रकारचे लेखन केले. १९८३-८४ सुमारास त्यांचे निधन झाले.

अभ्यंकर यांनी संपूर्ण इंग्रजी हा विषय घेऊन एम.ए. केले होते. त्यापूर्वी त्यांना बी.ए.साठी कोल्हापूर विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यांनी नाट्य, गायन, खेळ यांबरोबरच वक्तृत्वात भाग घेतला. नर्सिंगचे शिक्षण घेतलेल्या कुसुमताई त्यांच्या डाॅक्टर पतीना त्यांच्या व्यवसायात मदत करत.

अभ्यंकर या दोन वेळा (१९७८ आणि १९८०) रत्‍नागिरी मतदार संघातून आमदार म्हणून निवडून गेल्या होत्या.

पुस्तके

संपादन
  • अतृप्त मी (कादंबरी)
  • कठपुतळी (कादंबरी)
  • आव्हान (अनुवादित, मूळ लेखिक- जेम्स हॅडली चेस
  • कशी मोहिनी घातली (कादंबरी)
  • गोधडी (कथासंग्रह, सहलेखक - डाॅ. प्रकाश अत्रे). या पुस्तकात कुसुम अभ्यंकर यांच्या चार आणि प्रकाश अत्रे यांच्या १० लघुकथा आहेत.
  • चौदाव्या मजल्यावरून (कादंबरी)
  • जातो मी दूर देशी (कादंबरी)
  • जांभ्या दगडाचे डोळे (कादंबरी)
  • जीवनदान (कादंबरी)
  • ठिणगी (कादंबरी)
  • दीपज्योती (कादंबरी)
  • त्यागमूर्ती (कादंबरी)
  • दोन दिसांची रंगत संगत (कादंबरी)
  • धर्मात्मा (कादंबरी)
  • नीना मीना (कादंबरी)
  • परत येऊ नको (कादंबरी)
  • परीस (कथासंग्रह)
  • महानगर (कादंबरी)
  • मी हरले ती जिंकली (कादंबरी)
  • लाल बंगली (नाटक)
  • विकेशी (कादंबरी)
  • विघ्नहर्ती (कादंबरी)
  • सन्मान (कादंबरी)
  • सूड (कादंबरी)
  • सोनबावरी (कादंबरी)
  • हरे राम हरे कृष्ण (कादंबरी)


(अपूर्ण)