कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार

यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या कुसुमाग्रज अध्यासनाच्या वतीने कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्कार नावाचा पुरस्कार गैरमराठी भाषेत लिहिणाऱ्या साहित्यिकांना देण्यात येतो.

एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

कुसुमाग्रज राष्ट्रीय साहित्य पुरस्काराचे मानकरी

संपादन
  • इ.स. २०१० - कन्नड भाषेतील कवी जयंत कैकिणी
  • इ.स. २०११ - हिंदी भाषेतील कवी चंद्रकांत देवताले
  • इ.स. २०१२ - मल्याळी साहित्यिक डॉ. के. सच्चिदानंदन
  • इ.स. २०१३ - गुजराती लेखक सीतांशू यशश्चंद्र
  • इ.स. २०१४ : पंजाबी साहित्यिक डॉ. सुरजित पातर
  • इ.स. २०१५ : इंग्रजीतून लेखन करणारे नागा साहित्यिक तेमसुला आओ
  • इ.स. २०१६ : छिंदवाड्याचे हिंदी लेखक डॉ. विष्णू खरे.
  • इ.स. २०१७ : कन्नड लेखक डॉ.एच.एस. शिवप्रकाश.
  • इ.स. २०१८ : उर्दू,हिंदी,डोगरी लेखक वेद राही.