कुमिहिमो

दोर आणि वेणी बनवण्याची पारंपारिक जपानी कलाकृती

कुमिहिमो (組み紐) ही वेणी आणि दोरी बनवण्याची पारंपारिक जपानी कला आहे.[] याचा शब्दशः अर्थ "एकत्रित धागे" असा होतो. कुमिहिमो हे धागे, सामान्यत: रेशीम, पारंपारिकरित्या, विशेष यंत्रमाग वापरून एकमेकात गुंफुन बनवले जाते. विशेष यंत्रमागांची नावे मरुडाई (丸台) ("गोल स्टँड") किंवा टाकडाई (高台) (कोडाई म्हणूनही ओळखले जाते) अशी आहेत.

कुमिहिमो वेणी
एक अर्धवट तयार झालेले कुमिहिमो, विणकाम करताना ताण देण्यासाठी लावलेले वजने दिसून येत आहेत

कुमिहिमो विणण्याच्या विविध शैली आहेत. या शैलींमध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेणीची दोरी तयार केली जाते. अगदी सपाट वेणीपासून ते जवळजवळ संपूर्ण गोलाकार वेणी बनवल्या जातात. कुमिहिमोचा वापर ओबिजीम म्हणून केला जातो, हा किमोनो परिधान करताना पुढच्या बाजूस पट्ट्यासारखा वापरला जातो.

इतिहास

संपादन

कुमिहिमो वेणी प्रथम वेगवेगळ्या धाग्यांना एकत्र करून फिंगरलूप वेणी तयार केल्या गेल्या. नंतर, मारुडाई आणि टाकडाई सारखी साधने विकसित केली गेली, ज्यामुळे अधिक जटिल वेण्या कमी वेळात विणल्या जाऊ शकत होत्या.

सध्याच्या काळात, कुमिहिमो विणकामाची चकती अस्तित्वात आहेत. या चकत्यांमध्ये सामान्यत: ३२ खाचा असतात. या वापरून घनदाट आणि घट्ट कुमिहिमो विणता येतात. या चकत्या पारंपारिक मारुडाईसाठी अधिक स्वस्त आणि पोर्टेबल पर्याय आहेत. या चकत्या खरेदीसाठी विविध आकारात उपलब्ध आहेत.

तथापी या आधुनिक फोम कुमिहिमो चकत्या कमी लवचिक मानल्या जातात. यात विणकरास ३२ पेक्षा अधिक धागे वापरत येत नाहीत. तसेच त्या धाग्यांची जाडी खाचेच्या रुंदीने बांधिल असते. मरुडाई मुळे विणकारास वेगवेगळ्या प्रकारच्या कुमिहिमो वेण्या विणता येतात, उदा सपाट, चौकोनी किंवा पोकळ. आधुनिक फोम कुमिहिमो चकत्या विणकराला सपाट वेण्या तयार करण्यास मदत करतात.

कुमिहिमो सर्वात प्रमुख ऐतिहासिक वापर समुराई द्वारे केला गेला.[] त्यांच्या लॅमेलर चिलखत आणि त्यांच्या घोड्यांचे चिलखत (बार्डिंग) बांधण्यासाठी याचा वापर झाला होता. सध्या कुमिहिमोचा वापर हाओरी जॅकेटस् आणि किमोनो परिधान करताना होतो. तसेच दोरखंड बनवण्यासाठीही याचा वापर होतो.

संबंधित शब्द

संपादन
  • कागामी – मरुडाईवरील वरच्या वेणीचा पृष्ठभाग; आरशासाठी जपानी शब्द.
  • काँगो गुमि – गोल कॉर्डसाठी नमुन्यांचा एक वर्ग ज्यामध्ये एकूण सोळा स्ट्रँड्ससाठी अर्ध्यामध्ये दुमडलेले आठ धागे असतात. घड्याळाच्या दिशेच्या क्रमाने, प्रत्येक बॉबिन विरुद्ध बाजूला हलविला जातो. जेव्हा धाग्याच्या रंगाचे वेगवेगळे संयोजन वापरले जाते, तेव्हा अनेक मनोरंजक नमुने बनवता येतात. ज्यात कर्णरेषेचे पट्टे, पार्श्वभूमीवरील हिरे, हृदयासारखे त्रिकोण आणि लहान सहा-पाकळ्यांची फुले यांचा समावेश होतो.
  • मरुडाई किंवा मारू दाई - ही वेणीसाठी वापरली जाणारी फ्रेम आहे. "मारु दाई"चा अर्थ "गोल स्टँड" असा आहे.
  • मिझुहिकी , शुगी-बुकुरो लिफाफे सारख्या वस्तूभोवती गुंडाळलेल्या सजावटीच्या दोर.
  • ओबी - पारंपारिक पोशाखात वापरला जाणारा रुंद कापड; कुमिहिमो पट्टा, ज्याला ओबिजीम म्हणतात, ओबीभोवती बांधलेला असतो.
  • ओबीजेमि - ओबी सुरक्षितपणे बांधण्यासाठी वापरण्यात येणारी दोरी.
  • टाकादाई - ही एक मोठ्या, फ्लॅट, आडवा कुमिहिमो वेणी तयार करण्यासाठी वापरली जाणारी आयताकृती फ्रेम आहे.
  • तमा - बॉबिन्स . तमाच्या भोवती वळण तयार करून, धागा स्वतःच्या खाली सरकवून धागा बंद होण्यापासून दूर ठेवला जातो. खरा रेशीम हा खडबडीत पृष्ठभाग असलेला पोकळ फायबर आहे जो हलक्या हाताने ओढल्याशिवाय लूपमधून पुढे सरकण्यास प्रतिकार करतो. सिंथेटिक तंतूंसाठी, लवचिक प्लास्टिक "क्लॅमशेल" बॉबिन श्रेयस्कर असू शकते.

बाह्य दुवे

संपादन

संदर्भ

संपादन
  1. ^ "इंग्रजी आवृत्ती".
  2. ^ "समुराई वापर". 2021-11-13 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2021-11-13 रोजी पाहिले.