कुमारी सेलजा

भारतीय राजकारणी

कुमारी सेलजा (सप्टेंबर २४, इ.स. १९६२- हयात) या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आहेत. त्या इ.स. १९९१ आणि इ.स. १९९६च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातील सिरसा लोकसभा मतदारसंघातून तर इ.स. २००४ आणि इ.स. २००९च्या लोकसभा निवडणुकांमध्ये हरियाणा राज्यातीलच अंबाला लोकसभा मतदारसंघातून लोकसभेवर निवडून गेल्या.