कुडाळी (निरंजना) ही महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील एक नदी आहे. तिचा उगम पाचगणी डोंगरावर भिलार या गावाजवळ भुतेश्वराच्या मंदिराजवळ होतो. भिलार रुईघर, महू, करहर, हुमगाव, बामणोली, कुडाळ, कळंभे, उडतरे या गावातून वाहत वाहत ही नदी वाई तालुक्यातील उडतरे या गावाजवळ कृष्णा नदीस मिळते.या नदीवर उडतारे-कुडाळ-पाचगणी-महाबळेश्वर वाई पाचवड कुडाळ मेढा आणि पुणे-बेंगलोर असे तीन महामार्गावरील पुल आहेत.

कुडाळी/ कुंडली नदी
इतर नावे निरंजना
उगम पाचगणी डोंगर भिलार
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ ४० की मी प्रवाह
उपनद्या हातेघरनाला
धरणे -महू धरण, हातेघर

कुडाळी नदीचा संगम अतिशय रमणीय असा आहे हा संगम वाई तालुक्यातील उडतारे या गावाजवळ होतो त्या ठिकाणी वाकाईदेवीचे मंदिर तसेच पुरातन विठ्ठल मंदिर आहे

पौराणिक कथा संपादन

कुडाळी नदीचा उगम पाचगणी च्या इथे भिलार ह्या गावी झाला आहे. निर्जना नावाची शबरी (एक आदिवासी भिल्लीण) तिने आंधळेपण दूर व्हावे म्हणून भगवान शंकराची तपश्चर्या केली त्याने तिला महादेव प्रसन्न झाले आणि वर माग सांगितले माझ्या आश्रमाजवळ खदिर वृक्ष आहे, खदिर म्हणजे खैराचे झाड, त्यापासून मी जलरूप व्हावे व तीरावरील मानवाचे कल्याण करून शेवटी भगवान विष्णूच्या पायापासून जिचा जन्म झाला अशा कृष्णा नदीस मिळावे. तेव्हा महादेवाने तिला वर दिला व ती निर्जना नदी वाहू लागली. ती कुडाळ खोऱ्यातून वहाते म्हणून तिला कुडाळी हे नाव पडले. पुढे निर्जना उडतरे ता.वाई गावा जवळ कृष्णेला मिळाली.