किन्शासा

आफ्रिकेतील काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी


किन्शासा (मागील नाव फ्रेंच: Léopoldville) ही आफ्रिकेतील काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक ह्या देशाची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. हे शहर देशाच्या पश्चिम भागात काँगो नदीच्या काठावर वसले आहे. नदीपलीकडे काँगोचे प्रजासत्ताक देशाची राजधानी ब्राझाव्हिल स्थित आहे. सुमारे ९४ लाख महानगरी लोकसंख्या असलेले किन्शासा हे पॅरिस खालोखाल जगातील दुसरे मोठे फ्रेंच भाषिक शहर तर लागोसकैरो खालोखाल आफ्रिकेमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

किन्शासा
Kinshasa
काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक देशाची राजधानी


ध्वज
चिन्ह
किन्शासा is located in Democratic Republic of the Congo
किन्शासा
किन्शासा
किन्शासाचे काँगोचे लोकशाही प्रजासत्ताकमधील स्थान

गुणक: 4°19′S 15°19′E / 4.317°S 15.317°E / -4.317; 15.317

देश Flag of the Democratic Republic of the Congo काँगोचे लोकशाही प्रजासत्ताक
राज्य किन्शासा
स्थापना वर्ष इ.स. १८८१
क्षेत्रफळ ९,९६५ चौ. किमी (३,८४८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ७८७ फूट (२४० मी)
लोकसंख्या  (२०१२)
  - शहर ९४,६३,७४९
  - घनता ९४९.७ /चौ. किमी (२,४६० /चौ. मैल)
प्रमाणवेळ यूटीसी + १:००
http://www.kinshasa.cd/

किन्शासाची स्थापना इ.स. १८८१ मध्ये झाली व तत्कालीन बेल्जियन राजा दुसरा लिओपोल्ड ह्याच्या नावावरून लिओपोल्डव्हिल असे ह्या शहराचे नाव ठेवण्यात आले. इ.स. १९२० साली लिओपोल्डव्हिल बेल्जियन काँगो वसाहतीची राजधानी बनली. स्वातंत्र्यानंतर १९६५ साली सत्तेवर आलेल्या मोबुटु सेसे सेको ह्याने ह्या शहराचे नाव बदलून किन्शासा असे ठेवले.

मोबुटुच्या कारकिर्दीदरम्यान अनेक कारणांस्तव ऱ्हास झालेले किन्शासा सध्या देखील आफ्रिकेमधील प्रमुख शहर मानले जाते.

बाह्य दुवे

संपादन
 
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत