पौराणिक वाङ्मयात किन्नरांना देवांचे गायक म्हणले आहे. ते कश्यपाची प्रजा आहेत, आणि हिमालयात राहतात. वायुपुराणानुसार किन्नर हे अश्वमुखांचे पुत्र होते. त्यांचे अनेक गण होते आणि ते गायनात आणि नृत्यांत प्रवीण होते. हिमालयाच्या परिसरात किन्नरांची सुमारे १०० शहरे होती. तेथली प्रजा खूप आनंदी आणि समृुद्ध होती. राजा द्रुम, सुग्रीव, सैन्य, भगदत हे त्यांचे राजे चांगलेच पराक्रमी होते. किन्नरांचा हिमालयाच्या बऱ्याच क्षेत्रावर ताबा व अधिकार होता.

किन्नौर हा हिमाचल प्रदेशातील एक जिल्हा आहे. रिकांग पिओ हे ह्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे.

किन्नौरच्या गॅझेटियरमध्ये किन्नरांसंबंधी ऐतिहासिक और सांस्कृतिक उल्लेख विस्तारपूर्वक केला आहे.


पहा : अप्सरा, गंधर्व, यक्ष, विद्याधर