काश्मिरी गोजा किंवा काश्मिरी गप्पीदास (इंग्लिश:Isabelline Chat) हा एक पक्षी आहे.

काश्मिरी गोजा

याची भुवई व डोळ्यांचे कडे पिवळे असलेला राखी तपकिरी वर्णाचा असतो. शेपटीवरील भाग व पार्श्वाचा भाग पांढरा व शेष शेपटीचा रंग काळसर तपकिरी व डोके पिवळट असते. खालील भागाचा रंग सायीसारखा. छाती आणि दोन्ही अंगाचा रंग गर्द असतो. नर-मादी दिसायला सारखे असतात.

वितरण संपादन

ते पाकिस्तान व वायव्य भारतात हिवाळ्यात आढळतात. वाराणशी, सेहोरे, अहमदनगरपुणे या भागांत भटकलेली आढळून येतात. नेपाळ, मालदीव आणि श्रीलंका या भागांत स्थलांतर करताना आढळून आले.

निवासस्थाने संपादन

ते वाळवंटी प्रदेश आणि झुडपे असलेली माळराने या ठिकाणी राहतात.

संदर्भ संपादन

  • पक्षीकोश - मारुती चितमपल्ली