कावीळ
सूचना |
खालील माहिती वैद्यकीय सल्ला नाही. कोणत्याही आजारासाठी आपल्या डॉक्टरकडूनच सल्ला घ्यावा. |
कावीळ हा विषाणूंमुळे किंवा काही आजाराच्या यकृतावरील दुष्परिणामांमुळे होणारा रोग आहे. याला इंग्रजीमध्ये 'हिपाटाईटीस' असे म्हणतात. हा मुख्यत्वेकरून यकृताचा रोग आहे. ह्या रोगाचे कारणीभूत असलेल्या विषाणूनुसार नाव दिले जाते. प्रत्येक विषाणूप्रमाणे पसरण्याचे मार्ग वेगवेगळे आहेत.
व्याख्या
संपादनकावीळ ही एक स्थिति आहे. यामध्ये त्वचा आणि डोळ्यामधील बाह्य पांढरा भाग रक्तातील पित्ताचे प्रमाण वाढल्याने पिवळा दिसायला लागतो. हे यकृताच्या आजाराचे लक्षण आहे. काविळीस ग्रीक भाषेमध्ये इक्टेरस म्हणजे पिवळा या अर्थाचा शब्द आहे. संस्कृतमध्ये काविळीस कामला असे म्हणतात.
वर्णन
संपादनयकृताचे प्रमुख कार्य कोलेस्टेरॉल सारख्या टाकाऊ पदार्थापासून पित्त बनविणे. पित्त लहान आतड्यात पित्तनलिकेमधून बाहेर सोडले जाते. एका अर्थाने यकृत हा शरीरातील रसायनांचा कारखाना आहे. शरीरात आलेली सर्व आणि या पासून विघटन झालीली सर्व रसायने, औषधे यकृतामधून विघटन होऊन येतात. पचन झालेले अन्नघटक, विषारी द्रव्ये, औषधे, सर्वासाठी हा एक थांबा आहे. रक्तामधील रसायनांवर यकृत प्रक्रिया करते. बाह्य रसायनावर प्रक्रिया केल्यानंतर राहिलेले अवशिष्ट भाग पित्तामधून शरीराबाहेर येतात. यामधील एक घटक बिलिरुबिन पिवळ्या रंगाचे आहे. हीमोग्लोबिनच्या विघटनानंतर बिलिरुबिन तयार होते. हीमोग्लोबिन मधील प्रथिन विघटनाचे हे उत्पादन. बिलिरुबिन शरीराबाहेर पडले नाही तर ते साठून राहते आणि इतर उतीना पिवळा रंग येतो. बिलिरुबिनचे रक्तातील सामान्य प्रमाण 0.2 मिग्रॅ / शंभर मिलि पासून 1.2 मिग्रॅ / शंभर मिलि असते. हे प्रमाण वाढून 3 मिग्रॅ / 100 मिलि झाले म्हणजे त्वचा आणि डोळ्यामधील बाह्य पांढरा भाग पिवळा दिसायला लागतो. पित्त यकृतामध्ये तयार होते. एकदा यकृतपेशीमध्ये तयार झाल्यानंतर ते पित्त वाहिन्यामधून एकत्र येते. पित्तवाहिन्या पित्तनलिकेमध्ये उघडतात. पित्तनलिकेची एक शाखा काहीं पित्त पित्ताशयामध्ये जमा करते. पित्ताशयामध्ये साठलेल्या पित्तामधील पाणी पित्ताशयाच्या भिंती शोषून घेतात. पित्ताची संहति त्यामुळे वाढते. पित्ताशयातील पित्त बाहेर आणणारी नलिका आणि यकृतामधील काहीं पित्त एका एकत्रित नलिकेद्वारे लहान आतड्यामध्ये उघडतात. एरवी पित्त थोड्या थोड्या प्रमाणात आतड्यामध्ये येतच असते. जेंव्हा अन्न जठरामध्ये येते त्या संवेदामुळे पित्ताशयातील पित्त मोठ्या प्रमाणात आतड्यामध्ये येते. पित्तनलिका आतड्यामध्ये उघडण्याआधी स्वादुपिंडामधील स्त्राव आणणारी स्वादुरस नलिका पित्तनलिकेबरोबर मिळते. पित्त आणि स्वादुरस दोन्ही एकत्रपणे आतड्यात उघडतात. नलिकेस असलेल्या ॲळम्पुला ऑफ व्हेटरच्या झडपेने नलिकेमधील स्त्राव नियंत्रित होतो. लहान आतड्यात आल्यानंतर पित्त आणि स्वादुपिंड रस दोन्ही मिळून अन्नपचनास मदत करतात.
कारणे आणि लक्षणे
संपादनकाविळीची अनेक कारणे आहेत. प्रामुख्याने त्याचे तीन गट पडतात. पित्त कोठे आहे यकृत पूर्व , यकृतामध्ये किंवा यकृतपश्चात. बिलिरुबिन तयार झाल्यानंतर ते पाण्यात अविद्राव्य असते. यकृतामुळे बिलिरुबिन पाण्यात विद्राव्य होते. याला अविद्राव्य आणि विद्राव्य बिलिरुबिन असे म्हणतात. रक्ततपासणीमधून विद्राव्य आणि अविद्राव्य बिलिरुबिनचे प्रमाण कळते.
हीमोग्लोबिन आणि बिलिरुबिनची निर्मिती
संपादनबिलिरुबिनचा प्रारंभ हीमोग्लोबिन पासून रक्त निर्मिती अवयवामध्ये होतो. रक्तनिर्मितीचा मुख्य अवयव अस्थिमज्जा आहे. नव्या रक्त पेशी तयार होण्याचे प्रमाण सामान्य प्रमाणाहून कमी असल्यास अधिक निर्माण झालेले हीमोग्लोबिनचे विघटन बिलिरुबिनमध्ये होते. एकदा तयार झालेले हीमोग्लोबिन पेशीमध्ये गेले म्हणजे हीमोग्लोबिन तांबड्या रक्तपेशीच्या कालखंडापर्यंत टिकून राहते. मृत पेशीमधून बाहेर आलेले हीमोग्लोबिनपासून बिलिरुबिन तयार होते. काहीं कारणाने तांबड्या पेशी झपाट्याने मृत होऊ लागल्या आणि नव्या पेशींची संख्या कमी झाल्यास बिलिरुबिन रक्तामध्ये साठून राहते. या अधिकच्या बिलिरुबिनमुळे कावीळ होते.
रक्तविघटन विकृति (आजार)
संपादनअनेक आजारामध्ये तांबड्या रक्तपेशी मोठ्या संख्येने मृत होतात. तांबड्या पेशी मृत होण्याच्या या प्रकारास रक्तविघटन (लायसिस) म्हणतात. या मुळे होणारे आजार रक्तविघटन आजार या नावाने ओळखले जातात. जेवढ्या तांबड्या पेशी मृत होतात त्याहून कमी नव्या पेशी तयार झाल्यास रक्तक्षय होतो. अनेक आजार, विकृति, स्थिती आणि वैद्यकीय उपचारामध्ये रक्त विघटन होते.
मलेरिया
संपादनमलेरियाचा कारक जीव (प्लाझमोडियम) तांबड्या रक्तपेशीमध्ये असतो. त्याची पक्व अवस्था आली म्हणजे त्याचे पेशीमध्ये स्फुटन होते. ही क्रिया एकाच वेळी अनेक पेशीमध्ये होते. थोड्या थोड्या दिवसाने रोगाची लक्षणे त्यामुळे प्रकट होतात. जेंव्हा अनेक पेशी एका वेळी नष्ट होतात त्याने मृत पेशीमधील हीमोग्लोबिनचे बिलिरुबिन मध्ये विघटन होते आणि कावीळ होते. बिलिरुबिनमुळे मूत्र पिवळे होते. मलेरियामधील हे स्थिति गंभीर असते.
औषधांचा पार्श्व परिणाम
संपादनकाहीं औषधामुळे रक्तपेशींचा नाश होतो. हा विरळा पण त्वरित होणारा पार्श्वपरिणाम आहे. या औषधामध्ये प्रतिजैविके आणि क्षय प्रतिबंधकांचा समावेश आहे. याबरोबर हृदयाचे ठोके नियंत्रित करणारे लेव्होडोपा नावाचे औषध आणि पार्किंन्सन आजारावरील औषधांचा समावेश आहे.
ग्लूकोज 6 फॉस्पेट डीहायड्रोजिनेझ
संपादनकाहीं व्यक्तीमध्ये ग्लूकोज 6 फॉस्पेट डीहायड्रोजिनेझ या विकराची उणीव असते. हा एक जनुकीय आजार आहे. जगभरात वीस दशलक्ष व्यक्तीमध्ये हा आजार आहे. ग्लूकोज 6 फॉस्पेट डीहायड्रोजिनेझ कमतरता असणा-या व्यक्तीमध्ये दिली जाणारी औषधे रक्तपेशींचा नाश करतात. यातील काहीं औषधे तर फक्त ग्लूकोज 6 फॉस्पेट डीहायड्रोजिनेझ कमतरता असणा-या रुग्णामध्येच असा परिणाम दर्शवतात. व्हिटॅमिन सी, के आणि मलेरिया प्रतिबंधक औषधे अशा परिणामाबद्दल कुप्रसिद्ध आहेत.
विषारी द्रव्ये=
संपादनसापाचे आणि कोळ्याचे विष, जिवाणूजन्य विषे, तांबे आणि कार्बनी औद्योगिक रसायने प्रत्यक्ष तांबड्या रक्तपेशीच्या आवरणावर परिणाम करून ते नष्ट करतात.
हृदयाच्या कृत्रिम झडपा
संपादननैसर्गिक हृदयाच्या झडपामध्ये अनेक कारणाने दोष उत्पन्न होतो. अशा वेळी हृदयाच्या कृत्रिम झडपा शस्त्रक्रियेने हृदयात बसवता येतात. यातील कृत्रिम झडपांच्या पृष्ठभागामुळे तांबड्या रक्तपेशीना इजा झाल्याचे दिसून आले आहे. अशा झडपा बसविण्याची वेळ आलीच तर डुकराच्या हृदयातील झडपा बसविण्याचा सल्ला शल्यतज्ञ देतात.
आनुवंशिक तांबड्या पेशींचे आजार
संपादनतांबड्या रक्तपेशींशी संबंधित अनेक जनुकीय आजार आहेत. जनुकीय उत्परिवर्तनामुळे हीमोग्लोबिनचा आकार आणि परिणामकारकता बदलते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे सिकल पेशींचा अनिमिया आणि थॅलॅसेमिया. स्फीरोसायटॉसिस नावाच्या आजारात तांबड्या पेशीचे आवरण जीर्ण झालेले असते. काहीं जनुकीय आजारात तांबड्या पेशीमध्ये जैवरासायनिक बिघाड झालेला असतो.
प्लीहेची वाढ
संपादनजठराच्या वरील कोप-यामध्ये अन्नमार्गाला जोडलेला प्लीहा नावाचा अवयव आहे. यामधून रक्त गाळले जाते. या अवयवामधून मृत रक्तपेशी प्रवाहातून बाजूला केल्या जातात. प्लीहेचा आकार वाढल्यास त्यातून मृत पेशीऐवजी सामान्यपेशीसुद्धा बाजूला केल्या जातात. मलेरिया, काही इतर परजीवी आजार, कॅन्सर , ल्युकेमिया, आणि काहीं आनुवंशिक ॲतनिमियामध्ये प्लीहेमधून जाणा-या रक्तप्रवाहास अडथळा होतो. प्लीहेचाआकार त्यामुळे मोठा होतो आणि सामान्य पेशी सुद्धा प्लेहीमध्ये बाजूला केल्यामुळे रक्तातील सामान्य पेशींची संख्या कमी होते.
केशवाहिन्यामधील आजार
संपादनकाहीं कारणाने केशवाहिन्याची अंतत्त्वचा नष्ट झाली म्हणजे तांबड्या रक्तपेशीचे बदललेल्या खडबडीत पृष्ठ्भागाबरोबर घर्षण हो ऊन त्या नष्ट होतात. अगदी सूक्ष्म रक्तवाहिन्यांचा व्यास एका वेळी एकच रक्तपेशी जाईल एवढाच असतो. अशा केशवाहिनीमधून जाताना तांबड्या पेशी फुटतात.
• काहीं प्रकारचे कर्करोग आणि प्रतिकार यंत्रणा आजारात प्रतिकार पिंड प्रथिने तांबड्या रक्तपेशी नष्ट करतात. ही यंत्रणा एकदा कार्यान्वित झाली म्हणजे दृश्य आजार नसला तरी तांबड्या पेशींची संख्या कमी होत जाते. • रुग्णास चुकीच्या गटाचे रक्त दिले गेल्यास रक्तरसातील प्रतिद्रव्ये आणि शरीरातील पेशी एकत्र येतात. त्यांचे वहन होत नाही. • किडनी कार्य थांबणे आणि इतर गंभीर आजारात रक्त गोठते अशा प्रकारात रक्त पेशी नष्ट होतात. • इरिथ्रोब्लास्टोसिस फेटॅलिस या आजारात अपरिपक्व रक्तपेशी अर्भकाच्या रक्तप्रवाहात येतात. मातेचा आर एच रक्तगट वेगळा असल्यास मातेच्या रक्तातील प्रतिद्रव्य अर्भकाच्या रक्तामध्ये अपरेतून प्रवेश करते. अशा प्रकारात अर्भकामधील रक्तपेशींचा नाश होतो. नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाच्या काविळीचे हे प्रमुख कारण आहे. • कधी कधी रक्तगट परस्पराशी जुळणारे असले तरी नुकत्याच जन्मलेल्या अर्भकामध्ये बिलिरुबिनचे प्रमाण वाढून बाळास धोका पोहोचू शकतो.
अर्भकामधील सामान्य कावीळ
संपादनबहुतेक सर्व जन्मलेल्या बाळामध्ये दिसणारी कावीळ दोन कारणाने उद्भवते. एकास यकृतपूर्व कारणाने होणारी कावीळ आणि दुसऱ्या प्रकारात यकृतजन्य काविळीने रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढते. पहिल्या कारणात जन्मताच अर्भकाच्या रक्तातील हीमोग्लोबिनचे रूपांतर प्रौढ हीमोग्लोबिनमध्ये होते. बाळ गर्भामध्ये वाढत असता त्याला होणारा ऑक्सिजनचा पुरवठा मातेच्या रक्तामधून होतो. कमी उपलब्ध ऑक्सिजनमधून ऑक्सिजन वहन करण्यासाठी गर्भावस्थेमध्ये अर्भकाच्या रक्तातील हीमोग्लोबिन प्रौढ हीमोग्लोबिनपेक्षा वेगळे असते. जन्मल्यानंतर हवेमधील ऑक्सिजन घेण्यासाठी गर्भावस्थेतील हीमोग्लोबिन आवश्यक नसल्याने ते बदलले जाते. हे होत असता रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण वाढून यकृतावर ताण येतो आणि कावीळ होते. एक आठवड्यात अर्भकाचे हीमोग्लोबिन बदलून प्रौढ हीमोग्लोबिन तयार होण्याची प्रक्रिया पूर्ण झाली म्हणजे ही कावीळ आपोआप बरी होते.
यकृतजन्य कावीळ
संपादनसर्व यकृतजन्य काविळीमध्ये यकृताची बिलिरुबिन प्रक्रिया क्षमता क्षीण होते. उपासमार, रक्तातील परजीवी, काहीं औषधे, होपॅटायटिस आणि यकृतदाह यामुळे यकृतजन्य कावीळ होते. गिलबर्ट आणि क्रिग्लर नायार सिंड्रोम मध्ये यकृताची क्षमता बिघडते.
यकृतपश्चात कावीळ
संपादनया प्रकारची कावीळ एकदा यकृतामध्ये पित्त तयार झाल्यानंतर ते अन्ननलिकेमध्ये न पोहोचल्याने होते. या आजारास अवरोधी कावीळ म्हणतात. या प्रकारातील सर्वात अधिक प्रमाणात आढळणारी कावीळ म्हणजे पित्तनलिकेतील पित्ताचे खडे. इतर प्रकारामध्ये जन्मत: पित्तनलिकेमध्ये अडथळा असणे किंवा जिवाणू संसर्गामुळे पित्तनलिकेस सूज, अडथळा; काहीं औषधांचा परिणाम. कर्करोग, आणि प्रत्यक्ष इजा होणे आढळले आहे. काहीं औषधांमुळे आणि गरोदरपणात पित्त पित्तनलिकेमधून वाहणे एकाएकी बंद होते.
काविळीची लक्षणे आणि त्यामधील गुंतागुंत
संपादनपित्तामधील काहीं रसायने त्वचेमध्ये पोहोचल्यानंतर त्वचेस खाज सुटते. नुकत्याच जन्मलेल्या बालकाच्या मेंदूमध्ये पित्त साठल्यास मेंदूवर कायमचा परिणाम होऊ शकतो. दीर्घकाळ झालेल्या काविळीमुळे पित्ताचे खडे बनतात. डोळ्याचा आणि त्वचेचा पिवळेपणा ही सामान्य बाब आहे. गुंतागुंतीचे परिणाम सोडले तर कावीळ हा फार गंभीर आजार नाही. ज्या कारणाने कावीळ झाली त्यावरून काविळीमधून इतर लक्षणे निर्माण होतात.
निदान
संपादनतपासण्या- बहुतेक रुग्णामध्ये कावीळ झाल्याचे डोळ्याच्या आणि त्वचेच्या रंगावरून समजते. डॉकटर रुग्णास उताणे झोपवून यकृत हाताने चाचपून पाहतो. यकृताचा लवचिकपणा आणि प्लीहा मोठी झाली असेल तर पोटदुखीचे निदान करता येते. यकृतावर दाव दिल्यास काविळीमध्ये पोट दुखते. दुखणा-या पोटावरून आणि चाचपून यकृतजन्य किंवा अवरोधी काविळीचे निदान होते.
प्रयोशाळेतील चाचण्या
संपादनरक्तामधील दोष पाहण्यासाठी रक्त किंवा अस्थिमज्जा तपासणी करावी लागते. सुईने अस्थिमज्जा बाहेर घेऊन कधी कधी सूक्ष्मदर्शकाखाली पाहिल्यास अधिक माहिती समजते. पण बहुधा रक्ततपासणीमधून काविळीचे निदान होते. अल्ट्रासाउंड चाचणीमधून प्लीहेमधील बिघाड समजतो. न्यूक्लियर स्कॅन हा आणखी एक पर्याय आहे. यकृताच्या पेशी एका सुईने बाहेर काढून यकृतपेशीमध्ये काहीं बदल झाला असल्यास पाहता येतो. ही परीक्षा प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली करण्यात येते. अर्भकामध्ये काविळीचे निदान : अर्भकामध्ये कावीळ असल्यास खालील निष्कर्ष काढण्यात येतात. • बालक अपु-या दिवसाचे असते. • अशियायी किंवा मूळ अमेरिकन रेड इंडियन वंशाचे • बालक जन्मताना त्यास इजा झाली असल्यास • पहिल्या दोन तीन दिवसात झालेली वजनातील घट • समुद्रसपाटीपासून अधिक उंचावर जन्मलेली मुले • मातेस मधुमेह • प्रसूति कळाशिवाय होऊन प्रसवास बाह्य मदत करावी लागली 2003 मध्ये अंतर्गत तपासणी शिवाय रुग्णाच्या रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण शोधून काढण्यासाठी संशोधन करण्यात आले. त्यामुळे बाळाच्या काविळीचे फक्त पाहून निदान करणे थांबले. वैद्यकीय निदानासाठी त्वचेच्या रंगाचे मोजमाप करण्याची पद्धत सर्वत्र चालू झाली. एकदा घरी नेलेल्या बाळास वैद्यकीय स्वयंसेवकांनी चोवीस तासानंतर जाण्याची पद्धत चालू झाली. अंतरंग दृश्ये चाचण्या
पित्त वहन आणि साठवण्याच्या संस्थेमधील अडथळे किंवा बिघाड शरीरांतर्गत दृश्य पाहण्याच्या चाचणीमधून लक्षात येतात. क्ष किरण विरोधी द्रव पोटात घेऊन फोटोग्राफी केल्यास पित्तनलिकेमधील आणि पित्ताशयातील अडथळे समजतात. क्ष किरण विरोधी द्रव्य शरीतात घेण्याच्या अनेक पद्धती आहेत. सूक्ष्म सुईने थेट पित्तनलिकेमध्ये तो टोचता येतो. गॅस्ट्रोस्कोपने जठरामधून पुढे सरकवलेले उपकरण क्ष किरण विरोधी द्रव्य ॲेम्प्युला ऑफ व्हेटर मध्ये सोडता येतो. सीटी आणि एमआरआय चाचण्यानी यकृताचा कर्करोग आणि पित्ताशयातील खडे शोधता येतात. उपचार
अर्भकामधील कावीळ
संपादनकाविळीचे बरेच रुग्ण नुकतीच जन्मलेली अर्भके असतात. त्यांच्या रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण सतत मोजावे लागते. कारण अविद्राव्य बिलिरुबिन मेंदूमध्ये पोहोचल्यास मेंदूवर गंभीर परिणाम होतात. जन्मल्यानंतर काहीं तासात रक्तातील बिलिरुबिनचे प्रमाण अधिक असल्यास त्वरित उपचार करावे लागतात. काहीं दशकापूर्वी बाळाच्या शरीरातील पूर्ण रक्त बदलणे हा एकच पर्याय यासाठी होता. त्यानंतर ठराविक तरंग लांबीच्या अतिनील किरणामुळे बिरुबिन निर्धोक होते हे लक्षात आले. डोळ्यावर सुरक्षिततेसाठी संरक्षक पट्टी बांधून अर्भकास अतिनील किरणोपचार देतात. जसे बिलिरुबिन शरीरातून त्वचेखाली येते तेथे अतिनील किरणामुळे बिलिरुबिनचे विघटन होते. 2003 मध्ये बनवलेले स्टेनेट नावाचे औषध एफडीएच्या परवानगीच्या प्रतीक्षेत आहे. यामुळे बिलिरुबिनचे शरीरातील उत्पादन थांबते
रक्तविघटन आजार
संपादनरक्तविघटन आजारावर औषधे आणि रक्त संचरणाने (ट्रांस्फ्यूजन) उपचार करण्यात येतात. प्लीहा मोठी झाली असल्यास रक्त संचरण करण्यात येत नाही. प्लीहा शस्त्रक्रियेने काढून टाकल्याने कधी कधी रक्तविघटन आजार आटोक्यात येतात. रक्तविघटन करणारी औषधे आणि पित्ताचा प्रवाह त्वरित थांबवण्याने विघटन आजार आटोक्यात येतात. यकृतजन्य कावीळ : बहुतेक यकृताच्या विकारावर नेमके उपचार नाहीत. प्रत्यक्षात यकृत एवढा सुदृढ अवयव आहे की यकृतामधील थोडा फार बिघाड यकृत सहन करू शकते. थोडया निरोगी भागापासून उरलेले यकृत परत पुनुरुद्भवित (रीजनरेशन) होऊ शकते.
यकृत पश्चात कावीळ
संपादनअवरोधी कावीळीवरील उपचार शस्त्रक्रियेने करावे लागतात. मूळ पित्तमार्ग मोकळा करता आला नाही तर नवा पर्यायी मार्ग करावा लागतो. अशा प्रकारातील एक सर्वमान्य प्रकार म्हणजे यकृतावर एक लहान आतड्याचा उघडा भाग शिवून टाकणे. यकृताच्या त्या भागातील सूक्ष्म पित्तनलिका आतड्यामध्ये पित्त ओततात. अवरोध झालेल्या भागतील पित्ताचा दाब त्यामुळे कमी होतो. पित्त प्रवाह वाढला म्हणजे पित्तनलिकेचा आकार वाढतो. अशा पित्तनलिकेमधून पित्त लहान आतड्यामध्ये येत राहते.
प्रतिबंध
संपादनएरिथ्रोब्लास्टोसिस फेटॅलिस हा आजार असल्यास मातेचा रक्तगट आर एच निगेटिव्ह असतो. RhoGAM गॅमा ग्लोब्युलिन इंजेक्शन दिल्यास अर्भकाच्या विरुद्ध प्रतिद्रव्य निर्मिती होत नाही. G6PD ग्लूकोज सिक्स फॉस्पेट डीहायड्रोजिनेझ मुळे होणारे विघटन टाळता येते. आधीच उपचार केल्यास पेशी विघटन त्वरित थांबवता येते. लक्षणे कमी झाल्यानंतर औषधे त्वरित थांबवली म्हणजे तर होत नाही