कावळे उडाले स्वामी (ललित लेखसंग्रह)
कावळे उडाले स्वामी हा प्रसिद्ध मराठी कवी माणिक गोडघाटे ऊर्फ ग्रेस यांचा सहावा ललित लेखसंग्रह होय. इ. स. २०१० मध्ये त्याची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली.
अर्पणपत्रिका
संपादनया संग्रहाची अर्पणपत्रिका ग्रेस यांचे दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलशी आणि भारती मंगेशकर यांच्या पडवीशी असणारे सहबंध व्यक्त करणारी आहे. या अर्पणपत्रिकेच्या खाली दोन दिनांकांच्या उल्लेखाने एक कालखंड सूचित झालेला आहे. अर्पणपत्रिकेखाली तारखेचा उल्लेख असणारा हा ग्रेस यांचा दुसरा आणि अखेरचा संग्रह ठरतो.
परिचय
संपादनया संग्रहात एकूण ५१ ललित लेख समाविष्ट आहेत. चंद्रउदयिनी वेळा आणि गणमात्रांचे गणगोत असे या संग्रहाचे दोन विभाग आहेत.