काळू बाळू

(काळू-बाळू या पानावरून पुनर्निर्देशित)

तमाशासम्राट लहू संभाजी खाडे, अर्थात मराठी वगनाट्यांत गाजलेल्या काळू-बाळू जोडीतील काळू, (१६ मे, इ.स. १९३३[१][२] - ७ जुलै, इ.स. २०११; कवलापूर, सांगली जिल्हा, महाराष्ट्र) हे मराठी तमाशा कलावंत, अभिनेते व तमाशा फडाचे मालक होते. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश संभाजी खाडे म्हणजेच बाळू यांच्यासह जहरी प्याला या वगनाट्यात काळू-बाळू नावाच्या पोलिस हवालदारांच्या जोडगोळी रंगवली होती. त्यांच्या या भूमिका महाराष्ट्रभर इतक्या गाजल्या, की ते जोडनाव या दोघा भावंडांचे टोपणनाव बनले.

जीवनसंपादन करा

खाड्यांचा जन्म १६ मे, इ.स. १९३३ रोजी झाला. त्यांच्या घरी तीन पिढ्यांपासून तमाशाचा पेशा चालू होता[२]. खाड्यांनी त्यांचे जुळे बंधू अंकुश खाडे यांच्यासह ती परंपरा पुढे चालू ठेवली. जहरी प्याला या वगनाट्यामुळे काळू-बाळू या जोडीचे नाव महाराष्ट्रभर झाले. त्यांचा राम नाही राज्यात हा वगही गाजला.

काळू-बाळू जोडीला तमाशाकलेतील योगदानासाठी इ.स. १९९९-२००० सालांतील संगीत नाटक अकादमी पुरस्कार संयुक्तपणे देऊन गौरवण्यात आले [३].

वगनाट्येसंपादन करा

 • जिवंत हाडाचा सैतान
 • रक्तात रंगली दिवाळी
 • कोर्टात मला नेऊ नका
 • काळसर्पाचा विषारी विळखा
 • कथा ही दोन प्रेमिकांची
 • इंदिरा काय भानगड ?
 • रक्तात न्हाली अब्रू
 • इश्क पाखरू
 • लग्नात विघ्न
 • सत्ता द्यावी सुनेच्या हाती

आत्मकथनसंपादन करा

 • काळू-बाळू या नावाने यांचे आत्मकथन २००८ साली प्रसिद्ध झाले आहे. शब्दांकन सांगली येथील सुधीर कुलकर्णी यांनी केले असून प्रकाशक शुभदा कुलकर्णी या आहेत.

संदर्भसंपादन करा

 1. ^ "तमाशा कलावंत काळू यांचे निधन". ९ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)[मृत दुवा]
 2. a b "तमाशासम्राट लहू खाडे यांचे निधन". ९ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
 3. ^ "संगीत नाटक अकादमी पुरस्कार - पुरस्कारविजेत्यांची सूची" (इंग्लिश भाषेत). Archived from the original on १५ फेब्रुवारी २०१४. ९ जुलै, इ.स. २०११ रोजी पाहिले. |ॲक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)