काळी हळद (शास्त्रीय नाव:Curcuma caesia) हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.

या वनस्पतीची लागवड बंगालमध्ये होते. याचे ताजे गठ्ठे फिक्कट पिवळे असतात. मुख्य गठ्ठ्याचे बाजूचे गठ्ठे आल्यासारखे दिसतात. बाजारांत मिळणारे गठ्ठे काळसर करडे असून त्यांवर गोल कडीं असतात. आंतून करडा काळा रंग, फारच कठीण व शिंगासारखे, ह्याच्या पातळ चकत्या करड्या नारिंगी रंगाच्या; वास व रुची कापरासारखी. बंगालमधे ताजे गठ्ठे हळदीसारखे वापरतात.

याचे गुणधर्म कचोऱ्यासारखे असतात.

बंगालमध्ये याचे उटणे करतात. अंगाला येणाऱ्या घामावर उपाय म्हणून हे उटणे वापरतात.

संदर्भ

संपादन
  • ओषधीसंग्रह - डॉ. वा.ग.देसाई.