कालामुख ही पाशुपत संप्रदायाची आज लुप्तप्राय झालेली शाखा आहे. हे कपाळावर काळ्या रंगाचा आडवा पट्टा लावतात, म्हणून त्यांना ‘ कालामुख’ म्हणत. अकराव्या-तेराव्या शतकांत मुख्यतः कर्नाटकात व आंध प्रदेशात हा संप्रदाय होता, असे दिसते. शक्तिपरिषद व सिंहपरिषद असे ह्या संप्रदायाचे दोन उपपंथ होते. ह्या संप्रदायाचे संस्थापक-प्रचारक काश्मीरी बाह्मण असावेत, असे काही शिलालेखांवरून दिसते. हे वर्णभेद न करता सर्वांना ज्ञानदान करीत. ह्या पंथांच्या आचार्यांची विद्वत्ता, आचरण ह्यांमुळे त्यांच्याबद्दल लोकांत आदराची भावना होती. काहींच्या मते हा संप्रदाय म्हणजे वीरशैव पंथाचे पूर्वरूप होय. कालामुख आणि वीरशैव पंथ ह्यांच्यांत काही लक्षणीय समान वैशिष्टये आढळतातही. कालामुखांची मुख्य देवालये, मठ वीरशैवांच्या ताब्यात आहेत. वीरशैव त्यांना पुण्यक्षेत्रे मानतात. ह्या दोन्ही पंथांत लिंगपूजेवर भर आहे. वीरशैव धर्मगुरू आणि कालामुख धर्मगुरू ह्यांना ‘जंगम’ असे समान नाव आहे. कालामुख संप्रदायाची तात्त्विक भूमिका स्पष्ट होण्यासारखी साधने फारशी उपलब्ध नाहीत.

बाह्य दुवे संपादन