कार्ला डोंगर हे प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. फार वर्षांपूर्वी बौद्ध धर्माच्या लेण्या येथे बांधण्यात आल्या होत्या त्यांचा आजची कार्ला लेणी म्हणून उल्लेख आढळतो. कार्ला येथे असलेल्या लेण्या ह्या बौद्ध संस्कृतीचे दर्शन घडवतो,बऱ्याच लेण्या ह्या अपूर्ण आहेत व जीर्ण झालेल्या आहेत. मुंबई आणि परिसरातील मूळ रहिवाशी असलेला आगरी कोळी समाजाची एकवीरा देवी ही कुलदैवत मानली जाते. ठाणे मुंबई पालघर रायगड येथिल आगरी कोळी कराडी समाज येथे आवर्जून भेट देतात व देवीला आम्हाला सुखी ठेव आणि अशीच कृपा आम्हा आगरी कोळ्यांवर राहुदे असा आशिर्वाद घेतात.

[[ वर्ग :बौद्ध लेणी ]]