कायस्थ ही एक उच्चवर्णीय हिंदू जात आहे. हा समाज उत्तर भारतात प्रगत समाज समजला जातो. कायस्थ हे ब्राह्मण नसतात पण या जातीचे स्थान क्षत्रिय आणि ब्राह्मण यांच्या दरम्यान असल्याचे समजले जाते. महाराष्ट्रात या जातीची माणसे पुढारलेली समजली जातात. यांना मांसाहार वर्ज्य नसतो. उत्तर भारतात काश्मीरपासून बंगालपर्यंत कायस्थ समाज आहे. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद, माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री आणि सुभाषचंद्र बोस हे कायस्थ होते. पाकिस्तानातील मुसलमान कायस्थ या जातीचे लोक आहेत. <BR>

कायस्थ समुदायाचा जन्म ब्रम्हदेवाच्या कायेपासून झाला आहे असे मानले जाते. म्हणून चित्रगुप्ताला पहिला कायस्थ म्हणतात.


भाऊबीजेच्या दिवशी कायस्थ लोक चित्रगुप्ताच्या देवळात जातात आणि दौत-टाकाची आणि चित्रगुप्ताची पूजा करतात.

महाराष्ट्रात बहुतांश कायस्थ समाज चांद्रसेनीय कायस्थ प्रभू या नावे ओळखली जातात.