मुख्य मेनू उघडा

कापरेकर स्थिरांक -६१७४संपादन करा

भारतीय गणितज्ञ श्री दत्तात्रय रामचंद्र कापरेकर यांच्या नावे ‘'६१७४ ही संख्या कापरेकर स्थिरांक म्हणून ओळखली जाते. ही संख्या 'कापरेकर पद्धतीने' मिळवता येते. या पद्धतीत खालील प्रमाणे पायऱ्या आहेत.

  1. कुठलीही चार अंकी संख्या घ्या. ( या संख्येत कमीत कमी दोन तरी वेगळे अंक असावेत.सुरवातीचे दोन्ही अंक शून्य चालतील )
  2. या संख्येतील अंक एकदा चढत्या क्रमाने आणि एकदा उतरत्या क्रमाने लावून दोन संख्या तयार करा. ( उतरत्या क्रमाने बनणारी संख्या चार अंकापेक्षा लहान असेल तर सुरवातीला शून्य जोडून ती संख्या चार अंकी करा )
  3. मिळणाऱ्या मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करा.
  4. येणाऱ्या उत्तरासाठी दुसऱ्या पायरी पासून पुन: गणन करा.

कापरेकर पद्धतीने जास्तीत जास्त सात पुनारावृत्तीत कापरेकर स्थिरांक (६१७४) मिळतो.
उदाहणार्थ
उदाहरण १:
५४३२ – २३४५ = ३०८७
८७३० – ०३७८ = ८३५२
८५३२ – २३५८ = ६१७४


उदाहरण २:
२१११ – १११२ = ०९९९
९९९० – ०९९९ = ८९९१
९९८१ – १८९९ = ८०८२
८८२० – ०२८८ = ८५३२
८५३२ – २३५८ = ६१७४


उदाहरण ३:
९८३१ या संख्येतून कापरेकर पद्धतीने सात पुनारावृत्या कराव्या लागतात.
९८३१ – १३८९ = ८४४२
८४४२ – २४४८ = ५९९४
९९५४ – ४५९९ = ५३५५
५५५३ – ३५५५ = १९९८
९९८१ – १८९९ = ८०८२
८८२० – ०२८८ = ८५३२
८५३२ – २३५८ = ६१७४

संदर्भसंपादन करा