कानसाखळी
कानसाखळी हा कानात घालण्यात येणारा स्त्रियांचा दागिना आहे. हा दागिना विशेषतः भारतात वापरला जातो.
कानात घातलेल्या इतर वजनदार दागिन्यांमुळे, कानाच्या पाळीला करण्यात आलेले छिद्र ओघळून मोठे होऊ नये म्हणून कानसाखळी या सोन्याच्या दागिन्याची योजना असते. हा दागिना ताण म्हणून काम करतो. कानसाखळीचे एक टोक कानाच्या पुढील भागातून कुडीच्या किंवा डुलाच्या फिरकीमागे अडकवतात, व दुसरे कानाच्या पाळीच्या वरच्या भागाला किंवा केसात अडकवतात.
हा दागिना नाजूक व हलका असतो. हा पारंपरिक व मौल्यवान दागिना खूप लोकप्रिय आहे. यात वेगवेगळी डिझाईन असतात. तरीही हा रोज घालायचा दागिना नाही.
याच कानसाखळीला वेल सुद्धा म्हणतात. जर हा वेलासारखा दिसत असेल तर त्याच्या नक्षीमध्ये हमखास पाने असतात.