काणूक बदक या पक्ष्याला इंग्रजी मध्ये Cotton teal असे म्हणतात. याला मराठी मध्ये वणकी पक्षी, वंडकी, फंडकी, पानकोंबडी, अडी काणूक असेही म्हणतात.

Indian sporting birds (1915) (14770432793)
Indian sporting birds (1915) (14564125947)

ओळखण संपादन

आकाराने हा पक्षी तीतीराएवढा असतो. हा सर्वात लहान बदक असतो. त्याच्या पिसाऱ्यात ठळक पांढरा रंग असतो आणि चोच आखूड असते. दिसायला त्याची चोच हंसाच्या चोचीसारखी असते. नराचा वरचा रंग उदी आणि गळ्याला काळी कंठी असते पंखाची किनार पांढरी असते. मादी पिवळसर झाक असते. कंठी व किनार नसते.

वितरण संपादन

निवासी स्थानिक स्थलांतर करणारे पक्षी पाणी असलेल्या प्रदेशात आढळतात. त्यामुळे ते जवळ जवळ सर्व भागात भारत भर आणि श्रीलंकेत दिसून येतात. तसेच मालदीप आणि अंदमान बेटावर भटके दिसून येतात.

निवासस्थाने संपादन

जिलानी आणि तळी

संदर्भ संपादन

पक्षिकोश

लेखकाचे नाव - मारुती चितमपल्ली