कांडोळ नावे- कांडोळ, भुताचे झाड, घोस्ट ट्री

शास्त्रीय नाव -स्टरक्युलीया युरेन्स (sterculia urens)

कुळ-स्टरक्युलीएसी कांडोळाच झाड नितळ, पांढऱ्या बदामी रंगाचे असते. म्हणून त्याला भुताचे झाड असे म्हणतात. केवळ वर्षाऋतूतच मोठी पाने म्हणजे जवळजवळ एक फुट व्यासाची, पंचकोनी पान पावसाळा ओसरताच अंतर्धान पावतात. याची फुल शेवाळी लालसर छटेची . नरपुष्प आणि स्री पुष्प भिन्न–भिन्न आणि मग येणारी फळ हिरवी आणि मग काळपट लाल अशी पाच फुगीर पाकळ्या असाव्यात तशी. त्याच्या पृष्ठभागावर खाजरी-बोचरी लव असते.

कांडोळ
कांडोळ

संदर्भ

संपादन

वृक्षराजी मुंबईची डॉ.मुग्धा कर्णिक