कांग्रयांग काउंटी

(कांग्रयोंग या पानावरून पुनर्निर्देशित)

कांग्रयोंग हे उत्तर कोरियातील हवांघाई प्रांतातील काउंटी आहे.[१]

इतिहास संपादन

कांग्रयोंग या काउंटीची स्थापना यी घराण्याच्या काळात झाली.इ.स.१८९५ साली नव्याने स्थापन झालेल्या हवांघाई प्रांतात याचे विलीनकरण करण्यात आले.इ.स.१८९६ व १९०९ साली ही काउंटी सीमावादात अडकली होती.इ.स.१९५२ या काऊंटीचा पुनश्च एकदा स्वतंत्र रीतीने हवांघाई प्रांतात समावेश करण्यात आला.

भौगोलिक परिस्थिती संपादन

ह्या काउंटीच्या उत्तरेला पयोकसोंग काउंटी आहे व पश्चिमेला ओंगजिन काउंटी आहे.पूर्वेला हेयजुचा उपसागर आहे व दक्षिणेला कोरियाचा समुद्र आहे.या काउंटीचे एकूण क्षेत्रफळ ५२२.७ कि.मी.वर्ग एवढे आहे.हे ओंगजिनच्या द्वीपकल्पामध्ये अवस्थित आहे.माउंट चामनामु (२८६ मी.) हे या काउंटीतील उच्च स्थान आहे.[२]

लोकसंख्या संपादन

इ.स.२००८ नुसार या काउंटीची एकूण लोकसंख्या १,०६,८२७ आहे आणि लोकसंख्येचे एकूण घनत्व एकूण २०० कि.मी.वर्ग एवढे आहे.

वाहतूक व्यवस्था संपादन

येथील वाहतूक व्यवस्था ही ओंगजिन काउंटीच्या अंतर्गत चालते.या काउंटीत कोरियन रेल्वेची रेल्वे व्यवस्था आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ "Mindat.org". www.mindat.org. 2022-11-05 रोजी पाहिले.
  2. ^ "Wikimapia - Let's describe the whole world!". wikimapia.org. 2022-11-05 रोजी पाहिले.