Disambig-dark.svg

कसर (इंग्लिश : Discount) ही विक्रेत्याने ग्राहकाला खरेदीकिंमतीत दिलेली सूट अथवा सवलत होय.

प्रकारसंपादन करा

१) व्यापारी कसर (इंग्लिश : Trade Discount) - वस्तूच्या विक्रीच्या वेळी वस्तूच्या किमतीमधून कमी केली जाणारी रक्कम म्हणजे व्यापारी कसर होय . वस्तूच्या छापील किमतीवर व्यापारी कसर दिली जात असल्याने तिची नोंद लेखापुस्तकात केली जात नाही. थोडक्यात वस्तू कमी किमतीला विकली गेली असे गृहीत धरून विक्रीच्या किंमतीचीच नोंद लेखापुस्तकात केली जाते.

२) रोख सवलत / कसर - रोख रक्कम घेतेवेळी कमी करून घेतलेली रक्कम म्हणजे रोख कसर / रोख सवलत होय. विक्री करताना पैसे त्वरित मिळावे म्हणून रोख कसर देऊ केली जाते. क्वचितप्रसंगी ऋणकोकडून उधारीची वसुली व्हावी म्हणूनही रोख कसर दिली जाते. व्यापारी कसर दिल्यानंतर रोख कसर दिली जाते म्हणजे रोख कसर हा विक्रेत्याचे सरळसरळ नुकसान आहे आणि ग्राहकाचा फायदा. विक्रीच्या रकमेनंतर रोख कसर देऊ केली जाते म्हणून विक्री आणि जमा झालेली रोख रक्कम यात फरक पडतो. त्यामुळे रोख कसरीची नोंद लेखापुस्तकात करून झालेले नुकसान दर्शविले जाते.