कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

(कसबा गणपती या पानावरून पुनर्निर्देशित)

कसबा गणपती हा पुणे शहरातील मानाचा पहिला गणपती मानला जातो.[] पुण्याची ग्रामदेवता म्हणून कसबा गणपती ओळखला जातो.[] कसबा गणपती हे पुण्याचे प्रमुख देवता (ग्रामदेवता) आहे. कसबा गणपती हा पुणे, महाराष्ट्रातील पहिला मानाचा गणपती, किंवा सर्वात आदरणीय गणपती मानला जातो. या मूर्तीची स्थापना 1893 मध्ये झाली आणि ती पुण्यातील कसबा पेठ परिसरात आहे, जो शहराचा एक प्राचीन भाग आहे. याला गणपती बापूराव बेभान दरबार यांचे संरक्षण आहे आणि ते पुण्याचे प्रमुख दैवत मानले जाते. ही मूर्ती स्वयंनिर्मित असल्याचे म्हटले जाते आणि ती मुळात तांदळाच्या दाण्याएवढी होती, परंतु आता लाल चंदनाच्या थरामुळे ती मोठी झाली आहे.

ऐतिहासिक महत्त्व

संपादन

कर्नाटकतील इंडी येथून आलेल्या ब्राह्मणांच्या आठ कुटुंबांपैकी ठकार नावाच्या कुटुंबाने, कसबा गणपतीची स्थापना केली. जिजाबाई म्हणजेच शिवाजी महाराजांची आई यांनी हे देऊळ बांधले.[] हा गणपती एका दगडी गाभाऱ्यात असून तांदळा स्वरूपात आहे. तांदळा म्हणजे हात-पाय वगैरे अवयव नसणारी मुखवटावजा मूर्ती. पुणे शहरात अशा प्रकारच्या मूर्तीचे हे एकमेव देऊळ असावे. राजमाता जिजाबाई आणि गणेशभक्त ठकार यांना झालेल्या दृष्टांतानुसार जमीन खणल्यावर ही मूर्ती सापडली अशी आख्यायिका आहे. गणपतीच्या या मूर्तीच्या डोळ्यात हिरे आणि नाभिस्थानी माणिक बसवलेले आहेत. शिवाजी महाराज आपल्या प्रत्येक स्वारीपूर्वी या गणपतीचे दर्शन घेत असत. म्हणून या गणपतीला ’जयति गणपति’ असे म्हणतात. आजही घरात होणाऱ्या मंगल कार्याची पहिली अर्पणपत्रिका या गणपतीपुढे ठेवण्यात येते, आणि लग्नकार्य पार पडल्यावर वधूवरांना लगेचच या गणपतीच्या दर्शनाला आणतात. या गणपतीला पुण्यात प्रथम पूजेचा व ग्रामदैवताचा मान आहे. पुणेला गणपतीच शहर म्हंटल जात. जुन्या काळी गणपतीचे कार्यक्रम शनिवारवाड्यात होत असे. मंदिरास लाकडी सभामंडप असून उजव्या बाजूस ओवऱ्या दिसतात. १८व्या शतकानंतर पेठेची विशेष वाढ झाली. कस्ब या फारसी शब्दापासून कसबा शब्द आला.

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ

संपादन
 
गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रमान असलेला कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा गणपती पालखीतून नेला जात असताना (इ.स. २००८)

कसबा गणपती सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ हे पुण्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहे. इतर चार मंडळांसह या मंडळाला पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणुकीत मानाचे स्थान आहे. हा गणपती विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी असतो.[]

संदर्भ

संपादन
  1. ^ "गणेशोत्सव काळात ऑनलाईन माध्यमातून उत्सवाचा आनंद घ्यावा". एबीपी माझा. 2021-09-07. 2021-09-08 रोजी पाहिले.
  2. ^ "इतिहास पुण्यातील मानाच्या गणपती बाप्पां". दैनिक प्रभात. 2022-09-02. 2022-09-03 रोजी पाहिले.
  3. ^ "कसबा पेठ गणपतीचा इतिहास". सकाळ. 2021-09-08 रोजी पाहिले.
  4. ^ "पुण्यातील मानाच्या गणपतींचा इतिहास आणि विसर्जन मिरवणुक, जाणून घ्या". पोलीसनामा. 2019-08-27. 2021-09-17 रोजी पाहिले.

बाह्यदुवे

संपादन
पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीतील मानाचे गणपती  
कसबा गणपतीतांबडी जोगेश्वरी गणपतीगुरुजी तालीम गणपतीतुळशीबाग गणपतीकेसरीवाडा गणपतीदगडूशेठ हलवाई गणपती