कवडीपाट
कवडीपाट महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यातील मुठा नदीवरील बंधारा आहे.
येथे पुणे-सोलापूर रस्त्यावर कवडी गावाजवळ पक्षी-आश्रयवन आहे. हे साधारण कच्छ्मधील छारी धांड सारखे आहे.
महामार्गावरील पहिल्याच टोलनाक्यानंतर साधारणपणे एक किलोमीटरवर कवडी गावाकडे जाणारा रस्ता आहे. शेतांमधून जाणारा ह्या रस्त्याला मध्येच रेल्वेचे रूळ आडवे येतात. हा रस्ता लहान असून, दोन-अडीच किलोमीटरवर संपतो आणि मुळा-मुठा नदीचा किनारा लागतो.
इथे नदीत एक छोटा बंधारा बांधण्यात आल्याने, पाणी अडून राहते. नदीत पुण्याचा सर्व कचरा पाण्यावाटे येत असल्यामुळे, पाणी काळसर आणि दुर्गंधीयुक्त आहे. पण तरीही दर हिवाळ्यात अनेक पक्षी या ठिकाणाला भेट देतात. या बंधाऱ्याला कवडीपाट म्हणतात. हा कवडीपाट पक्ष्यांचे आश्रयवन आहे.
कवडीपाटावरील लघुपट
संपादनकवडीपाटावर किरण घाडगे यांनी कवडी अ डाइंग रिव्हर नावाचा लघुपट बनवला आहे. ’सीएमएस वातावरण’ या संस्थेतर्फे दिल्लीला ९ ते १२ ऑक्टोबर २०१५या काळात ८वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव होणार आहे. त्यावेळी दाखवण्यासाठी पर्यावरणावर आधारित २३ देशांतून १७८ लघुपट पाठवण्यात आले आहेत. त्यांमधील पहिल्या ७५ लघुपटांमध्ये याचा समावेश आहे.