कलचुरी वंश
कलचुरी राजवंशाने सुमारे बाराशे वर्षे (इ.स. ५५० ते १७४०) भारताच्या कोणत्याना कोणत्यातरी प्रदेशावर राज्य केले. कलचुरी हे नर्मदा नदीच्या तीरावर असणाऱ्या महिष्मती या नगरीत उदयास आले. कृष्णराज हा कलचुरीकुळाचा मूळ पुरूष होय. कलचुरी राजवंशाच्या त्रिपुरीचे कलचुरी व रत्नपूरचे कलचुरी अशा दोन शाखा होत्या.
कलचुरी वंशातील राजे
संपादन- कृष्णराज (इ.स. ५५० ते ५७५)
- शंकरगण (इ.स. ५७५ ते ६००)
- बुद्धराज
त्रिपुरीचे कलचुरी राजे
- वामराजदेव (इ.स. ६७५ ते ७००)
- लक्ष्मणराज (इ.स. ८२५ ते ८५०)
- युवराजदेव (इ.स. ९१५ ते ९४५)
- द्वितीय लक्ष्मणराज (इ.स. ९४५ ते ९७०)
- कोकल्ल दुसरा (इ.स. ९९० ते १०१५)
- कर्णदेव (इ.स. १०४१ ते १०७३)
- यशःकर्ण (इ.स. १०७३ ते ११२३)
रत्नपूरचे कलचुरी राजे
- जाजल्लदेव (इ.स. १०९० ते ११२०)
- रत्नदेव दुसरा (इ.स. ११२० ते ११३५)
- पृथ्वीदेव पहिला (इ.स. ११३५ ते ११६५)