कर्मान किंवा कार्मेनिया (फारसी: استان کرمان;ओस्तान ए केर्मान) हा इराण देशाच्या ३१ प्रांतांपैकी एक आहे. इराणच्या आग्नेय भागात स्थित असलेला हा प्रांत आकाराने इराणमध्ये दुसऱ्या क्रमांकावर असून कर्मान ह्याच नावाचे शहर येथील राजधानीचे शहर आहे.

कर्मान
استان کرمان
इराणचा प्रांत

कर्मानचे इराण देशाच्या नकाशातील स्थान
कर्मानचे इराण देशामधील स्थान
देश इराण ध्वज इराण
राजधानी कर्मान
क्षेत्रफळ १,८०,७२६ चौ. किमी (६९,७७९ चौ. मैल)
लोकसंख्या २९,३८,९८८
घनता १६ /चौ. किमी (४१ /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ IR-08
प्राचीन काळी बांधलेली बर्फ साठवण्यासाठीची इमारत
केर्मान प्रांताच्या महान शहरातील शाझदेह बाग
शाहदाद शहरातील पाच हजार वर्षांपूर्वीचा काश्याचा ध्वज

बाफ्त, बरदसीर, बाम, जिरोफ्त, जौपर, राफसंजान, झरांद, सिरजान, शहर ए बाबक, केर्मान, महान, रायेन, कहनुज, घलेगंज, मनुजान, रूडबार ए जोनोब, अनबार आबाद आणि रावार ही कर्मान प्रांतातील काही मोठी शहरे आहेत.

प्राचीनकाळात हा भाग कार्मेनिया या नावाने ओळखला जायचा.[] येथील भूभाग भूकंपप्रवण क्षेत्रात मोडत असून आजवर येथे अनेक मोठे भूकंप झाले आहेत.

संदर्भ व नोंदी

संपादन

बाह्य दुवे

संपादन
  • "अधिकृत संकेतस्थळ" (फारसी भाषेत). 2012-12-06 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2013-07-17 रोजी पाहिले.