कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय (सातारा)

कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय, सातारा हे महाराष्ट्र राज्यातील विनाअनुदानित जुन्या अभियांत्रिकी शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. सदर महाविद्यालय १९८३ मध्ये महाराष्ट्र शासनाने विनाअनुदानित अभियांत्रिकी महाविद्यालयांना दिलेल्या परवानगी नंतर रयत शिक्षण संस्था[१] ने स्थापन केले. १९८३ पासून महाविद्यालय शिवाजी विद्यापीठाशी [२] सलग्न होते, मात्र २०१७ शैक्षणिक वर्षासाठी ही सलग्नता टप्याटप्याने संपुष्टात येईल. महाविद्यालय २०१७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी सलग्न आहे

कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालय
ब्रीदवाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद
स्थापना १९८३
विद्यार्थी १०३३
संकेतस्थळ [२]



महाविद्यालय सुरुवातीच्या काळात छत्रपती शिवाजी कॉलेज, सातारा[३]च्या आवारात भरत होते. कॅंप भागात असलेल्या सध्याच्या महाविद्यालयाच्या इमारतीचे बांधकाम १९९० साली पूर्ण झाल्यावर महाविद्यालय हलविण्यात आले. [४] नवी दिल्ली द्वारा मान्यताप्राप्त आहे व २०१७ पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाशी संलग्न आहे.[५]

प्रमाणित संपादन

महाविद्यालयास राष्ट्रीय मूल्यांकन आणि प्रमाणन परिषद बंगळुरू (नॅंक) ने ९ सप्टेंबर २०१९ रोजी ४ पैकी २.८७ (ब++) गुणांनी प्रमाणित केले आहे.

संदर्भ संपादन

  1. ^ [१]
  2. ^ "Shivaji University, Kolhapur - One of the oldest and premier Universities in India". www.unishivaji.ac.in. 2020-07-02 रोजी पाहिले.
  3. ^ साचा:Http://cscsatara.com/
  4. ^ "Government of India, All India Council for Technical Education |". www.aicte-india.org. 2020-07-02 रोजी पाहिले.
  5. ^ "Dr. Babasaheb Ambedkar Technological University – डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ" (इंग्रजी भाषेत). 2020-07-02 रोजी पाहिले.

[१][२][३][४]

  1. ^ https://kbpcoes.edu.in/
  2. ^ "संग्रहित प्रत". Archived from the original on 2019-09-22. 2019-09-22 रोजी पाहिले.
  3. ^ http://rayatshikshan.edu/
  4. ^ http://technical.mahacet.org/cethome/frmfilterchoicecode.aspx?did=12126&programid=21[permanent dead link]