कमला दास
विकिपीडियाचा दर्जा राखण्यासाठी या लेखास किंवा विभागास विकिकरणाची गरज आहे. उपयुक्त विकिदुवे देऊन या लेखाचे विकिकरण करण्यास कृपया मदत करा]. संक्षिप्त मार्गदर्शन दाखवा
|
कमला दास (जन्म : ३१ मार्च १९३४; - ३१ मे २००९) म्हणजे एक अत्यंत विमनस्क कवयित्री, लेखिका. कमला दास यांचा जन्म १९३४ केरळमधील राजघराण्यात झाला. माध्वीकुट्टी या टोपण नावाने कमला दास ओळखल्या जात .
व्यतिगत जीवन
संपादनकमला दास यांचे वडील कलकत्यातील एका विश्वविख्यात कंपनीमध्ये वरिष्ठ अधिकारी होते. आई बालमणी अम्मा, या लेखिका. त्यामुळे लहानपणापासूनच कमला दास ह्यांना साहित्याची आवड निर्माण झाली. कलकत्यातील एका मिशनरी शाळेत त्यांचे शिक्षण झाले. तिथले जात-धर्माबद्दलचे अनुभव फार दुःखदायक होते. वयाच्या १५ वर्षीच त्यांचे लग्न लावून दिले. त्यांचे पती माधव दास बँकेत वरिष्ठ अधिकारी होते. माधव दास यांनीच त्यांना लिखाणासाठी प्रोसाहित केले. कमला दास यांनी इंग्रजी आणि मल्याळम भाषेतून लिखाण करण्यास सुरुवात केली. एका इंग्रजी वृत्तपत्रात त्याच्याबद्दल म्हंटले होते, 'दि मदर ऑफ मॉडर्न इंग्लिश इंडियन पोएट्री'- भारतातील आधुनिक इंग्रजी काव्याची जननी !'
आत्मचरित्र
संपादनइ.स.१९७२मध्ये कमला दास यांचे त्यांच्या वयाच्या ४२व्या वर्षी 'माय स्टोरी (मल्याळी नाव इंटे कथा)' हे मल्याळी आत्मचरित्र प्रसिद्ध झाले. प्रसिद्ध झाल्याझाल्याच ते अपरंपार, सर्वाधिक लोकप्रिय झाले व तेवढेच वादग्रस्तही ठरले. पंधरा दिवसांतच आत्मचरित्राच्या पन्नास हजार प्रती खपल्या. या आत्मचरित्रात स्त्रीच्या लैगिक भावनाचा उद्रेक, आशा, अपेक्षा यांच्यावर भर दिला आहे. नंतर त्यांनी आत्मचरित्राचा बराचसा भाग काल्पनिक असल्याचे सांगितले.
कथासंग्रह
संपादन- अमावसी
- दि केप्ट वूमन
- चाइल्डहूड ऑफ मलबार
- अ डॉल फॉर चाइल्ड प्राॅस्टिटयूट
- पद्यावती : दि हार्लेट अँड अदर स्टोरीज
- बचपन की यादें
कवितासंग्रह
संपादन- ओन्ली दि सोल नोज हाऊ टू सिंग
- दि ओल्ड प्ले हाऊस
- क्लोजर - सम पोएम्स अँड ए कॉन्व्हर्सेशन
- दि डीसेंडन्टस
- या अल्ला
- समर इन कलकत्ता