कमलाकर सोनटक्के हे एक प्रसिद्ध मराठी नाट्यशिक्षक अहेत. अपंगांच्या व्यक्तिमत्त्वविकासासाठी व पुनर्वसनासाठी काम करणाऱ्या कांचन सोनटक्के या त्यांच्या पत्नी.

कमलाकर सोनटक्के हे दिल्लीच्या राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे विद्यार्थी. ही संस्था भारतभरातून आलेल्या इच्छुकांमधून दरवर्षी केवळ २० प्रशिक्षणार्थीची निवड करते आणि त्यांना तीन वर्षाची शिष्यवृत्ती देते. या विद्यालयात प्रवेश मिळाल्यावर सोनटक्के यांना अल्काझींसारखे नाट्यशिक्षक त्यांना लाभले, आणि परिणामी ते स्वतःच नाट्यशिक्षक झाले. रंगभूमीचा फारसा अनुभव नसताना, नाट्य विद्यालयात प्रशिक्षण घेताना क्रमाक्रमाने जेमतेम पास होतहोत, तिसऱ्या वर्षांला सर्व विषयांत प्रथम क्रमांक मिळवून कमलाकर बेस्ट ऑल राऊंडर ठरले आणि आणि शेवटी भरत पुरस्कार विजेता झाले.[१]



(अपूर्ण)

  1. ^ "Kamlakar Sontakke". sangeetnatak.gov.in (इंग्रजी भाषेत). २ डिसेंबर २०१८ रोजी पाहिले.