मूलभूत कण

(कण या पानावरून पुनर्निर्देशित)

पदार्थाचे विभाजन करत राहिल्यास सर्वात शेवटी उरणारा पदार्थ तो मूलकण. एकेकाळी Atomचे म्हणजे अणूचे अधिक विभाजन शक्य नसल्याने अणू हाच मूलकण समजला जाई. जेव्हा अणू हा इलेक्ट्रॉन्स, प्रोटॉन्स आणि न्यूट्रॉन्सचा बनला आहे हे समजले तेव्हा त्यांना मूलकण समजले जाऊ लागले. जसजशी पुंज भौतिकी शास्त्रात प्रगती होऊ लागली तसे नवेच कण मूलकण म्हणून पुढे आले.

मानक प्रतिमानच्या मूलकण सूची

पुंज भौतिकी शास्त्राच्या प्रचलित संकल्पनेनुसार निसर्गात सहा मूलभूत कण आहेत. ते असे :- क्वार्क्स, लेप्टॉन्स, ॲन्टिक्वार्क्स, ॲन्टिलेप्टॉन्स, गेज बोसॉन्स आणि स्केलर बोसॉन्स.

क्वार्क्सचे उपप्रकार :- अप क्वार्क, डाऊन क्वार्क, स्ट्रेंज क्वार्क, चार्म क्वार्क, टॉप क्वार्क आणि बॉटम क्वार्क. एकाधिक क्वार्क एकत्र येऊन हॅड्रॉन तयार होतात. हॅड्रॉनचे मेसॉन आणि बॅरिऑन्स हे दोन प्रकार आहेत. बॅरिऑन तीन क्वार्क पासून बनतो. प्रोटॉनमध्ये दोन अप आणि एक डाऊन तर न्यूट्रॉनमध्ये एक अप क्वार्क आणि दोन डाऊन क्वार्क असतात.