कडवी नदी महाराष्ट्रातील एक नदी आहे. ही वारणेची एक प्रमुख उपनदी आहेत. कोल्हापूर जिल्ह्यातील कडवी नदीचा उगम सह्याद्री पर्वतात अंबा घाटाजवळ सु. ७०० मी. उंचीच्या प्रदेशात होतो.

सुमारे ३५.४ किमी. वाहून कडवी नदी सागावजवळ वारणा नदीस मिळते. कडवी नदी मिळाल्यावर तिचा प्रवाह बराच विस्तारित होतो. कडवी नदी वारणा नदीस जवळजवळ समांतर वाहते. पोटफुगी, आंबरडी, अंवीर व कांद्रा हे प्रमुख ओढे कडवी नदीस मिळतात.