ही एक प्रकारची कचरा नियोजनाची प्रक्रिया आहे, की ज्याच्यामध्ये कचरयामधील जैविक घटक अति ऑक्सिजनच्या सानिध्यात जाळले जातात. टाकाऊ गोष्टींचे इंन्सनीरेशन केल्यानंतर त्यातून राख, वायु व उष्णता मिळते. टाकाऊ कचऱ्यातील अजैविक घटकामुळे राख तयार होते, तेच राखेचे कण वायुसोबत निघुण जातात. तो वायु हवेमध्ये सोडण्याआधी राखेचे कण गाळून मगच वातावरणामध्ये सोडले जातात. काही प्रकरणांमध्ये जी उष्णता तयार होते ती विद्युत शक्ती तयार करण्यासाठी वापरली जाते. गॅसिफिकेशन, औष्णिक विघटन (पायरोलिसिस) आणि हवारहित अपचन यासारखीच इंन्सनीरेशन ही पण एक प्रकारची ऊर्जा पुनर्प्राप्ती करण्याची प्रक्रिया आहे. इंन्सनीरेशन व गॅसिफिकेशन या प्रक्रीयांचे कामाचे तत्त्व एकच आहे पण इंन्सनीरेशन मधून जी ऊर्जा तयार होते ती उच्च तापमान असलेली उष्मा असते व ज्वलनशील वायू हा गॅसिफिकेशन प्रक्रियेचे मुख्य उत्पादन आहे. ऊर्जा आणि सामग्री पुनर्प्राप्ती शिवाय इंन्सनीरेशन आणि गॅसिफिकेशन देखील लागू केले जाऊ शकते. बऱ्याच देशांमध्ये, तज्ञ आणि स्थानिक समुदायांकडून अजूनही इंन्सनीरेशन करण्याच्या प्रक्रियेचा पर्यावरणावरील परिणामाबद्दल चिंता आहे. काही देशांमध्ये, काही दशकांपूर्वी बनवलेल्या इंन्सनीरेटरमध्ये अनेकदा दहन होण्यापूर्वी घातक, अवजड किंवा पुनर्वापरयोग्य साहित्य काढून टाकण्यासाठी सामग्रीचे पृथक्करण समाविष्ट केले जात नव्हते. गॅस साफसफाईची अपुरी पातळी आणि दहन प्रक्रिया नियंत्रणामुळे या सुविधांमुळे कामगारांच्या आरोग्यास आणि स्थानिक वातावरणास धोका होत असे. जास्त प्रमाणामध्ये ह्या प्रकारच्या सुविधेतून विद्युत ऊर्जा बनत नाही. इंन्सनीरेशन प्रक्रीयाची उपुक्तता ही काही निश्चित प्रकारच्या कचरयातील जसे की वैद्यकीय कचरा व काही हानिकारक कचरा मधील रोगजनक व विषारी घटकांची विल्हेवाट उच्च तापमानात लावण्यासाठी होते. कचरा जाळणे ही जपान, सिंगापूर आणि नेदरलँड्स देशांमध्ये फारच प्रचलित आहे कारण जमीन हे तेथील दुर्मिळ संसाधन आहे. इंन्सनीरशन मधून येणारी उर्जा वापरन्यामध्ये डेन्मार्क आणि स्वीडन ही अग्रगण्य राष्ट्र आहेत.

इंन्सनीरेटर:

इंन्सनीरेटर ही कचरा जाळण्याची एक प्रकारची भट्टी आहे. आधुनिक प्रज्वलित यंत्रांमध्ये फ्ल्यु गॅस साफसफाईसारख्या प्रदूषण शमन उपकरणांचा समावेश आहे. इनसिनेटर प्लांट डिझाइनचे विविध प्रकार आहेत उदाहरणार्थ, फिरती शेगडी, निश्चित शेगडी, फिरती-भट्टी आणि फ्लूइडाएजड बेड.