कंदअभिवृद्धी
कंदअभिवृद्धी (Bulb) कंद हे मूलभूत परिवर्तीत खोड असते. या परिवर्तीत खोडाभोवती जाड मांसल शल्क (Scale) असतात. त्यात अन्न साठवलेले असते. या शल्काच्या बेचक्यात छोटे छोटे कंद तयार होतात. हे शल्क जमिनीतच तयार होतात. हे जर जमिनीवर खोडावर लागले तर त्यांना क्ंदिका (Bulb) म्हणतात. ट्यूलिप, डॅफोडील, लिली यांची अभिवृद्धी या क्ंदापासून मिळणाऱ्या अपप्ररोहापासून मिळते. निशिगंधाची अभिवृद्धी याच पद्धतीने होते.