ओरलँडो (फ्लोरिडा)
(ओरलॅंडो या पानावरून पुनर्निर्देशित)
ओरलॅंडो (इंग्लिश: Orlando) हे अमेरिकेची संयुक्त संस्थाने देशाच्या फ्लोरिडा राज्यामधील एक मोठे शहर आहे. मध्य फ्लोरिडामध्ये वसलेल्या ओरलॅंडो शहराची लोकसंख्या २.३८ लाख तर ओरलॅंडो महानगर क्षेत्राची लोकसंख्या २०,८२,६२८ इतकी आहे. ओरलॅंडो हे फ्लोरिडामधील पाचव्या तर अमेरिकेतील ८०व्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.
ओरलॅंडो Orlando |
|
अमेरिकामधील शहर | |
देश | अमेरिका |
राज्य | फ्लोरिडा |
स्थापना वर्ष | इ.स. १८७५ |
क्षेत्रफळ | २६१.५ चौ. किमी (१०१.० चौ. मैल) |
समुद्रसपाटीपासुन उंची | ९८ फूट (३० मी) |
लोकसंख्या | |
- शहर | २,३८,३०० |
प्रमाणवेळ | यूटीसी - ५:०० |
www.cityoforlando.net |
ओरलॅंडो हे अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्ट, युनिव्हर्सल ओरलॅंडो रिसॉर्ट व सीवर्ल्ड ओरलॅंडो ही तीन अतिविशाल मनोरंजन उद्याने (थीम पार्क) ओरलॅंडोमध्ये स्थित आहेत.
वाहतूक
संपादनओरलॅंडो आंतरराष्ट्रीय विमानतळ येथील प्रमुख विमानतळ आहे. याशिवाय ओरलॅंडो सॅनफर्ड विमानतळ आणि ओरलॅंडो मेलबर्न विमानतळ या महानगराला विमानसेवा पुरवतात.
गॅलरी
संपादन-
वॉल्ट डिस्नी वर्ल्ड रिसॉर्टमधील मॅजिक किंग्डम
-
युनिव्हर्सल ओरलॅंडो रिसॉर्टमधील युनिव्हर्सल स्टुडिओज फ्लोरिडा
-
सीवर्ल्ड ओरलॅंडो
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |