ओमर अली सैफुद्दीन तिसरा, ब्रुनेई

ओमर अली सैफुद्दीन तिसरा (२३ सप्टेंबर, इ.स. १९१४:इस्ताना कोट, सुलतान लामा, ब्रुनेई शहर - ७ सप्टेंबर, इ.स. १९८६) हा ब्रुनेईचा २८वा सुलतान होता. हा ४ जून, इ.स. १९५० ते ४ ऑक्टोबर, इ.स. १९६७पर्यंत सत्तेवर होता.

Omar Ali Saifuddien III.jpg

हा सुलतान मुहम्मद जमालुल आलम दुसरा आणि त्याची बायको राज इस्तरी फातिमाच्या दहापैकी दुसरा मुलगा होता. सुलतान अहमद ताजुद्दीन हा याचा मोठा भाऊ होता. तिसऱ्या ओमर अली सैफुद्दीनने चार लग्ने केली. पैकी दुसऱ्या बायकोपासून त्याला दहा मुले आणि कमीतकमी ६४ नातवंडे झाली. सध्याचा ब्रुनेईचा सुलतान हसनल बोल्किया याचा मुलगा आहे.