ओखी चक्रीवादळ
'ओखी चक्रीवादळ' हे सन २०१५ नंतरच्या 'मेघ' या चक्रीवादळानंतर, अरबी समुद्रात उठलेले सर्वात तीव्र उष्ण कटिबंधीय चक्रीवादळ होते.याचा उद्गम हा २९ नोव्हेंबर २०१७चे सुमारास श्रीलंकेपासून झाला.भूमीच्या जवळ असल्याने, याची तीव्रता वाढली नाही.पण त्याचे अरबी समुद्रात आगमन झाल्यावर १ दिसेंबरला ते तीव्र झाले. शीलंकेत जिवीत व वित्त हानी केल्यानंतर ते लक्षद्वीप बेटाकडे व नंतर भारताकडे झेपावले.त्याचे शेवटच्या चरणात,गुजरात हे राज्य याच्या कवेत येण्याची शक्यता आहे.
बांगलादेशने यास ओखी नाव दिले.याचा अर्थ डोळा असा होतो.[१][२]
या वादळाने सुमारे ३८ बळी घेतलेत त्यासोबतच अनेक मासेमार हे बेपत्ता आहेत.[३]
भारत
संपादनमुंबई व कोकण किनारपाट्टीस याचा धोका होता. पण त्याची तीव्रता कमी झाल्यामुळे तो टळला आहे. पण, त्यामुळे सुमारे ७० किमी. प्रती तास यावेगाने वारे वाहतील व पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे.[४]मुंबईजवळ समुद्र खवळलेला होता.
बचाव पथकाने, सुमारे ५५६ मासेमारांचा जीव वाचविला. तामिळनाडू व केरळ येथील ८०९ मासेमार हे कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले. गुजरात, दमण दीव, दादरा नगरहवेली येथे यामुळे नुकसान होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
लक्षद्वीप
संपादनया ठिकाणी प्रभावित नागरिकांना भारतीय नौदलाने मदतीचा हात दिला व खाद्यसामग्री दिली.
संदर्भ
संपादन- ^ Pacha, Aswathi. "How cyclone 'Ockhi' got its name". The Hindu. ५ डिसेंबर २०१७ रोजी पाहिले.
- ^ "जाणून घ्या 'ओखी' चक्रीवादळाच्या नावामागची रंजक गोष्ट". Loksatta. 2018-12-19 रोजी पाहिले.
- ^ "ओखी चक्रीवादळ: तामिळनाडू, केरळमध्ये ९ जणांचे बळी-news-Video | Maharashtra Times". https://maharashtratimes.indiatimes.com. 2018-12-19 रोजी पाहिले. External link in
|संकेतस्थळ=
(सहाय्य)[permanent dead link] - ^ "ओखी चक्रीवादळ: मुंबईसह उपनगरातही दमदार पाऊस". 24taas.com (इंग्रजी भाषेत). 2018-12-19 रोजी पाहिले.