ऑलिंपियास
ऑलिंपियास (जन्म/ मृत्यू सुमारे इ.स.पू. ३७५- इ.स.पू. ३१६) ही एपिरसची राजकन्या मॅसेडोनियाचा राजा फिलिप दुसरायाची पत्नी होती आणि अलेक्झांडर द ग्रेट याची आई होती. ती प्राचीन ग्रीक योद्धा अकिलिसच्या घराण्यातील असल्याचे सांगितले जाते.
ऑलिंपियास ही मोलोस्शियन राजा नेओटोलेमसची मुलगी होती. प्राचीन ग्रीसच्या शेजारी असलेल्या आयोनिया या देशातील एपिरस येथे नेओटोलेमसचे राज्य होते. फिलिपशी संधी करण्याच्या हेतूने ऑलिंपियास आणि फिलिप यांचा विवाह घडून आला.