ऑर्थर कॉनन डॉयल
सर आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल (इंग्लिश: Arthur Ignatius Conan Doyle, जन्म : एडिनबरो-स्कॉटलंड, २२ मे १८५९; - क्रोबरो, ईस्ट ससेक्स, इंग्लंड, ७ जुलै १९३०) हा स्कॉटिश लेखक होता. त्याने इंग्लिश भाषेत रहस्यकथा, विज्ञानकथा, कादंबऱ्या व कविता लिहिल्या. त्याने लिहिलेल्या शेरलॉक होम्स या काल्पनिक सत्यान्वेषी पात्राच्या रहस्यकथा लोकप्रिय असून गुन्हेगारीविषयक इंग्लिश साहित्यातील मानदंड मानल्या जातात.
सर आर्थर कॉनन डॉयल | |
---|---|
जन्म नाव | आर्थर इग्नेशियस कॉनन डॉयल |
जन्म |
२२ मे १८५९ एडिनबरो, स्कॉटलंड |
मृत्यू |
७ जुलै १९३० क्रोबरो, ईस्ट ससेक्स, इंग्लंड |
राष्ट्रीयत्व | स्कॉटिश |
कार्यक्षेत्र | साहित्यिक, डॉक्टर |
भाषा | इंग्लिश |
साहित्य प्रकार | हेरकथा, ऐतिहासिक कादंबरी, ललितेतर साहित्य |
प्रभाव | एडगर ॲलन पो |
प्रभावित | ॲगाथा ख्रिस्ती आणि इतर हेरकथाकार |
स्वाक्षरी |
सर आर्थर कॉनन डॉयल यांच्या ’शेरलॉक होम्स’ कथांची मराठीत अनेक भाषांतरे झाली आहेत. त्यांतली काही अशी (कंसात अनुवादकार) : -
- संपूर्ण शेरलॉक होम्स (गजानन क्षीरसागर)
- शेरलॉक होम्सच्या कर्तृत्त्व कथा (जैको प्रकाशन)
- शेरलॉक होम्सच्या साहसी कथा (जैको प्रकाशन)
- शेरलॉक होम्सच्या अखेरच्या काही साहसी कथा (जैको प्रकाशन)
- शेरलॉक होम्सः सुपर-ब्रेन (पंढरीनाथ सावंत)-"द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल्स" व "द व्हॅली ऑफ फिअर" या दोन कादंबऱ्या.
- द साईन ऑफ फोर (कादंबरी) (प्रवीण जोशी)
- द व्हॅली ऑफ फिअर (कादंबरी) (प्रवीण जोशी)
- द हाउंड ऑफ दि बास्करव्हिल्स (प्रवीण जोशी)
- शेरलॉक होम्सच्या पाच कथा (बिंबा केळकर) - द डिसॲपिरन्स ऑफ लेडी फ्रँन्सिस कार फॅक्स (काळ आला होता पण...), द ॲडव्हेंचर ऑफ ब्लॅक पीटर (काळोखातले कृष्णकृत्य), द ॲडव्हेंचर्स ऑफ द डेव्हिल्स फूट (सैतानी पाऊल) आणि द प्रॉब्लेम अँड थॉर ब्रिज (थॉर ब्रिजवरचे सूडनाट्य).
- शाबास, शेरलॉक होम्स! (भा.रा. भागवत) - पाच पुस्तके
- शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथा भाग १ ते ६ (भालबा केळकर)
- साहसी शेरलॉक होम्स (संजय कप्तान)
बाह्य दुवे
संपादनविकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: |
- सर कॉनन डॉयल.कॉम - चरित्र, कारकीर्द व साहित्यकृती (इंग्लिश मजकूर)
- शेरलॉक होम्स संग्रहालय, युनायटेड किंग्डम - अधिकृत संकेतस्थळ (इंग्लिश मजकूर)
- प्रोजेक्ट गुटेनबर्ग - ऑर्थर कॉनन डॉयल याचे साहित्य (इंग्लिश मजकूर)