ऑर्किड ही एक पुष्पवनस्पती आहे.याची फुले नाजूक, अनेकविध रंगाची आणि सुगंधी असतात. जगातील पुष्पवनस्पती कुळांतील हे दुसऱ्या क्रमांकाची सगळ्यात मोठे कुळ आहे. यात २८,००० पेक्षा अधिक वेगवेगळ्या वनस्पतींचा समावेश होतो. ही वनस्पती जगात जवळजवळ सगळीकडे आढळते. या वनस्पतीच्या २२,००० ते २६,००० जाती आहेत. हि वनस्पती बर्फाळ प्रदेश सोडून सगळ्या देशांमध्ये आढळते.या वनस्पतीचे उत्पादन खूप मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

जास्त प्रमाणात गवत असणाऱ्या ठिकाणी ऑर्किड जमिनीवर येते. ऑर्किडच्या काही जाती नामशेष झाल्या आहेत.