ऑपरेशन डायमंड
ऑपरेशन डायमंड इस्रायल देशाच्या गुप्तहेर यंत्रणा मोसादचे एक ऑपरेशन होते ज्याचे ध्येय सोव्हिएत संघत बनवलेल्या मिग-२१ विमानाचे अधिग्रहण हे होते. हे विमान त्या काळातील सर्वात प्रगत लढाऊ विमान होते. हे ऑपरेशन १९६३ च्या मध्यात सुरू झाले आणि १६ ऑगस्ट १९६६ रोजी संपले, जेव्हा इराकी-असिरियन फरारी पायलट मुनीर रेड्फा यांनी इराकी वायुसेनेचा मिग-२१ इस्रायलला आणला होता. त्यामुळे इस्रायल आणि अमेरिकेने या विमानाच्या डिझाईनचा अभ्यास केला.
Israeli MiG-21 acquisition operation | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | covert operation | ||
---|---|---|---|
स्थान | इस्रायल | ||
| |||
पहिले प्रयत्न
संपादन१९५९ साली मिग-२१ चे उत्पादन सोव्हिएत युनियनमध्ये सुरू झाले आणि इजिप्त, सीरिया आणि इराकने अनेक विमाने मिळविली. मोसादच्या गुप्तचर जीन थॉमसने इजिप्तमध्ये विमान पळविण्याचा पहिला प्रयत्न केला. थॉमस आणि त्याच्या गटाला पायलट शोधण्याचे आदेश देण्यात आले होते, जो इस्राईलला १,०००,००० डॉलर्समध्ये ते विमान आणुन देईल. तथापि, त्याचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाला. इजिप्शियन पायलट आदीब हन्ना, ज्याने त्यांच्याशी संपर्क साधला होता, त्यांनी थॉमसच्या हेतूबद्दल अधिकाऱ्यांना सांगितले. थॉमस आणि दोन इतरांना डिसेंबर १९६२ला अटक झाल्यानंतर फाशी देण्यात आली समूहातील अन्य तीन सदस्यांना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. मिग-२१ च्या अधिग्रहणाचा दुसरा प्रयत्नही अयशस्वी ठरला. ह्या प्रयत्नात अखेरीस मोसादच्या हेरांनी दोन इराकी पायलटांना ठार मारले ज्यांनी सहकार्य करण्यास नकार दिला होता.[१]
यश
संपादन१९६४ मध्ये एक इराकी वंशाचा यहूदी पुरुष यूसुफने तेहरानमध्ये इस्रायली सेवांशी संपर्क साधला. वयाच्या दहाव्या वर्षापासून तो एका मेरोनिट ख्रिश्चन कुटुंबात नोकर म्हणुन होता. त्याच्या प्रेयसीच्या ओळखीतुन मुनिर रेड्फहाबद्दल त्याला महिती मिळाली होती, जो एक इराकी पायलट होता पण इराकी वायुसेनेच्या वागणुकीमुळे तो नाखूष होता. एक ख्रिस्ती कुटुंबतील असल्याने, त्याला विश्वास होता की त्याला वायुदलात बढती मिळने शक्य नव्हते. यूसुफला हे कळून आले की रेड्फा इराक सोडण्याच्या प्रयत्नात होता. एक महिला मोसादच्या हेरानी रेड्फाशी मैत्री केली व त्याला इस्रायली गुप्तहेरांबरोबर भेटण्यासाठी युरोपमध्ये जाण्यास सांगितले. रेड्फाला १ कोटी डेलर, इस्रायलचे नागरिकत्व आणि पूर्णपगारी रोजगाराची ऑफर देण्यात आली, जी त्याने एका अटीवर मान्य केली कि त्याच्या कुटुंबाला सुरक्षितपणे इस्राईलमध्ये नेण्यात यावे. नंतर त्यांनी इस्रायलच्या वायुसेनेच्या कमांडर मेजर जनरल मोर्देचै होद यांची भेट घेतली आणि पुढील धोरण तयार केले.[२]
१६ ऑगस्ट १९६६ रोजी, रेड्फाने मिग-२१ मध्ये पूर्ण इंधन भरले व ते पश्चिमेकडे उडवत गेला. जॉर्डनच्या वाटेवर जाता त्याला इराकी वायुदलने परत येण्याची एक चेतावनी दिली. परंतु त्यानंतर तो इजरायलच्या प्रांतात पोहचला होते, जेथे दोन इस्रायली विमानांनी त्याला मदत केली. मिग-२१ दक्षिण इस्रायलमध्ये हत्ज़ोर एअरबेसमध्ये उतरवले आणि दुसरीकडे, रेड्फाच्या कुटुंबाला वेगवेगळ्या ठिकाणी व कारणे दाखवुन मोसादच्या हेरांनी इस्रायलला आणले.[२]
परिणाम
संपादनयशस्वीरित्या इस्राईलमध्ये आल्यानंतर, मिग-२१ वरील खुणसंख्या बदलून ००७ (जेम्स बाँड) करण्यात आली. इस्रायली वायुसेनेने या मिग-२१चा सराव आणि अभ्यास केला. युद्धामध्ये ७ एप्रिल १९६७ रोजी इस्रायलने सहा सीरियन मिग-२१ विमाने पाडली. जानेवारी १९६८ मध्ये, इजिप्तने मिग-२१ अमेरिकेला दिले, ज्यामुळे ते देखील अभ्यास करू शकले. या कारणास्तव अमेरिकेने आधी विक्रीस नाखूष असताना आता मात्र इस्रायलला मॅकडोनेल डग्लस एफ-४ फैंटम II हे लढाऊ विमान विकण्याचा निर्धार केला.[३]
संदर्भ
संपादन- ^ कालुवाला, पंकज. ईस्रायलची मोसाद (इंग्रजी भाषेत).
- ^ a b लोच के जॉनसन. Strategic Intelligence, Volume 1 (इंग्रजी भाषेत).
- ^ Weiss, Reuven. "The Blue Bird Legend" (इंग्रजी भाषेत). २२ नोव्हेंबर २०१७ रोजी पाहिले.