एस्टोनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य

(एस्टोनियन सोव्हियेत साम्यवादी गणराज्य या पानावरून पुनर्निर्देशित)

एस्टोनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य (रशियन: Эстонская Советская Социалистическая Республика; एस्टोनियन: Eesti Nõukogude Sotsialistlik Vabariik) हे भूतपूर्व सोव्हिएत संघाच्या १५ गणराज्यांपैकी एक गणराज्य होते.

एस्टोनियन सोव्हिएत साम्यवादी गणराज्य
Эстонская Советская Социалистическая Республика (रशियन)
Eesti Nõukogude Sotsialistlik Vabariik (एस्टोनियन)

१९४०१९९१
ध्वज चिन्ह
राजधानी तालिन
शासनप्रकार सोव्हिएत संघाचे गणराज्य
अधिकृत भाषा एस्टोनियन, रशियन
क्षेत्रफळ ४५,२२७ चौरस किमी
लोकसंख्या ५४,००,८४१
–घनता ७७.५ प्रती चौरस किमी

१९४० साली जोसेफ स्टालिनच्या नेतृत्वाखाली सोव्हिएत संघाने एस्टोनिया, लात्व्हियालिथुएनिया ह्या तिन्ही बाल्टिक देशांवर लष्करी आक्रमण करून हा भूभाग आपल्या ताब्यात घेतला व येथे कम्युनिस्ट सरकारे स्थापन केली. दुसऱ्या महायुद्धादरम्यान १९४१ ते १९४४ दरम्यान एस्टोनियन सोसाग नाझी जर्मनीच्या अधिपत्याखाली होते. युद्धामधील जर्मनीच्या पराभवानंतर सोव्हिएतने एस्टोनियन सोसाग पुनर्स्थापित केले.

२० ऑगस्ट १९९१ रोजी सोव्हिएत संघाचे विघटन झाले व सोव्हिएत एस्टोनियाचे पुन्हा स्वतंत्र एस्टोनिया देशामध्ये रूपांतर झाले.